ALSO READ: अमरावती जिल्ह्यात धारणीमध्ये बैलगाडीवर विजेचा खांब कोसळून शेतकरी दाम्पत्य आणि दोन बैलांचा दुर्दैवी मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील कुर्ला पश्चिमच्या नौपाडा परिसरात मुसळधार पावसात झाड कोसळून एका ६३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. या दुःखद घटनेला प्रतिसाद म्हणून महापौर रितू तावडे यांनी मृताच्या कुटुंबाला ५ लाख रुपयांची नुकसान भरपाई जाहीर केली. त्यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.
ALSO READ: मुंबईत आज सोसाट्याचा वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता; शाळा आणि महाविद्यालये बंद, बीएमसीकडून सूचना जारी
मुंबईत अनेक ठिकाणी बीएमसीची कामे सुरू आहे. मुसळधार पावसासोबत सोसाट्याचा वारा वाहत आहे. या दोन्हींच्या एकत्रित परिणामामुळे शहरात झाडे आणि फांद्या कोसळण्याच्या अनेक घटना घडत आहे. महापौर रितू तावडे यांनी लोकांना केवळ अत्यावश्यक कामासाठीच घराबाहेर पडण्याचे आवाहन केले आहे.
ALSO READ: महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे भूस्खलन; रेल्वेने अनेक गाड्या रद्द केल्या आणि मार्ग बदलले
Edited By- Dhanashri Naik