महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे भूस्खलन; रेल्वेने अनेक गाड्या रद्द केल्या आणि मार्ग बदलले
Webdunia Marathi July 06, 2026 02:45 PM

भूस्खलनामुळे भारतीय रेल्वेच्या मध्य रेल्वे विभागाने अनेक गाड्या रद्द केल्या आहे आणि अनेक गाड्यांचे मार्ग बदलले आहे.

 

महाराष्ट्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई-पुणे घाट विभागात मोठे भूस्खलन झाले असून, रेल्वे रुळांवर मोठे दगड कोसळले आहे. यामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे.  रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. 

 

मध्य रेल्वेनुसार, सोमवारी पहाटे ३:०५ च्या सुमारास कर्जत-लोणावळा भोर घाट विभागातील ठाकूरवाडीजवळ भूस्खलन झाले. यानंतर, खंडाळा आणि मंकी हिल दरम्यान आणखी एक भूस्खलन झाले. मध्य रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकारी यांनी सांगितले की, सततच्या पावसामुळे मुंबईकडे जाणाऱ्या अप लाईन, पुण्याकडे जाणाऱ्या डाउन लाईन आणि सेंट्रल लाईनवर ढिगारा पडल्याने रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे.

ALSO READ: मुंबईत आज सोसाट्याचा वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता; शाळा आणि महाविद्यालये बंद, बीएमसीकडून सूचना जारी

भूस्खलनाच्या परिस्थितीमुळे रेल्वेने अनेक प्रमुख गाड्या रद्द केल्या असून इतर अनेक गाड्या वळवल्या आहे. रद्द झालेल्या गाड्यांमध्ये सीएसएमटी-पुणे इंद्रायणी एक्सप्रेस, इंटरसिटी एक्सप्रेस, डेक्कन एक्सप्रेस, डेक्कन क्वीन, प्रगती एक्सप्रेस, धुळे एक्सप्रेस आणि पुणे-सीएसएमटी सिंहगड एक्सप्रेस यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या मध्येच रद्द करण्यात आल्या, काहींचे मूळ स्थान बदलण्यात आले आणि इतर गाड्या वळवण्यात आल्या. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना प्रवासाला निघण्यापूर्वी आपल्या गाडीची स्थिती तपासण्याचे आवाहन केले आहे. रुळांवरील ढिगारा हटवण्याचे आणि सेवा पूर्ववत करण्याचे काम सुरू आहे.

ALSO READ: अमरावती जिल्ह्यात धारणीमध्ये बैलगाडीवर विजेचा खांब कोसळून शेतकरी दाम्पत्य आणि दोन बैलांचा दुर्दैवी मृत्यू

Edited By- Dhanashri Naik

ALSO READ: मुंबईत मोठी दुर्घटना; मानखुर्दमध्ये तीन मजली चाळ कोसळून ६ जणांचा मृत्यू


© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.