नागपूर : नागपूर जिल्ह्यातील पाटणसावंगी येथे वृद्ध महिलेवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याच्या प्रकरणाचा नऊ दिवसानंतर उलगडा झाला आहे. घटनेचा तपास करून आरोपीला बेड्या ठोकण्यात सावनेर पोलिस आणि गुन्हे शाखेच्या (Nagpur Crime News) पथकाला यश आलं आहे. अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या आरोपीला एलसीबीच्या पथकाने बोखारा येथून ताब्यात घेतले आहे. तांत्रिक पुरावे आणि चौकशीनंतर आरोपीने गुन्ह्याची कबुली (Nagpur Crime News) दिली आहे. गंगाबाई असे मृत महिलेच्या हातावर गोंदलेले नाव आहे. मात्र तिची वास्तविक ओळख अद्याप पटली नाही. सुधाकर बाबाराव मंडपे (४८) असे आरोपीचे नाव आहे, तो ब्राम्हणवाडा येथील रहिवाशी आहे. सावनेर येथे बांधकाम (Nagpur Crime News) कामगार म्हणून काम करत होता. २७ जूनच्या रात्री दहेगाव रंगारी येथील नागपूर – सावनेर महामार्गाच्या सर्व्हिस रोड परिसरात आरोपीने वृद्ध महिलेवर अत्याचार (Nagpur Crime News) करून तिची हत्या केल्याचे पोलिस तपासात उघड झाले होते. अत्याचार करून आरोपीने वृद्ध महिलेला अमानुष मारहाण केली. ज्यामुळे पोटातील आतड्या बाहेर आल्या होत्या.(Nagpur Crime News)
तांत्रिक पुरावे आणि ‘क्रॉस व्हेरिफिकेशन’ नंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. सुधाकर दादाराव मंडपे (४८) असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो मूळचा ब्राह्मणवाडा येथील रहिवासी असला तरी सध्या टाकळी (भन्साळी), ता. सावनेर येथे कुटुंबासह राहत असून, बांधकाम कामगार म्हणून काम करायचा. वृद्ध गंगाबाई २७ जूनच्या रात्री दहेगाव (रंगारी) येथील नागपूर-सावनेर महामार्गाच्या सर्व्हिस रोडने पायी जात असताना त्याने तिच्याशी संवाद साधला आणि तिला दुचाकीवर बसवून सोबत नेले. हा प्रकार एका बसचालकाने पाहिला होता. पोलिसांनी त्याच्याकडूनही खात्री करून घेतली.(Nagpur Crime News)
पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तांत्रिक पुरावे आणि ‘क्रॉस व्हेरिफिकेशन’च्या आधारे सखोल चौकशी केल्यानंतर आरोपीने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. सुधाकर बाबाराव मंडपे (४८) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मूळचा ब्राह्मणवाडा येथील असलेला सुधाकर सध्या सावनेर तालुक्यातील टाकळी (भन्साळी) येथे आपल्या कुटुंबासह राहत होता आणि बांधकाम मजूर म्हणून काम करत होता. २७ जूनच्या रात्री वृद्ध गंगाबाई दहेगाव (रंगारी) येथील नागपूर-सावनेर महामार्गाच्या सर्व्हिस रोडने पायी जात होत्या. त्यादरम्यान सुधाकरने त्यांच्याशी संवाद साधून त्यांना आपल्या दुचाकीवर बसवून सोबत नेले. हा संपूर्ण प्रकार एका बसचालकाने प्रत्यक्ष पाहिला होता, ज्याच्याकडून पोलिसांनी नंतर खात्री करून घेतली.
त्याच रात्री ९ ते १० वाजेच्या सुमारास आरोपीने वृद्ध महिलेवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. चौकशीदरम्यान, घटनेच्या वेळी आपण दारूच्या नशेत होतो, अशी कबुली त्याने दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सोमवार, ६ तारखेला सकाळी ११ वाजताच्या सुमारास सुधाकर बोखारा येथील आपल्या एका नातेवाईकाकडे गेला असता, स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने त्याला तिथून ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने पोलिसांना चुकीची माहिती देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी उपलब्ध तांत्रिक माहिती, पुरावे आणि सीसीटीव्ही फुटेजची सखोल पडताळणी करून त्याची पुन्हा कडक चौकशी केली असता त्याने गुन्हा कबूल केला.
लैंगिक अत्याचार केल्यानंतर सुधाकरने गंगाबाई यांना लाथाबुक्क्यांनी अत्यंत क्रूरपणे मारहाण केली. त्यांच्या शरीराच्या प्रत्येक भागावर मारहाणीच्या जखमा होत्या. या अमानुष मारहाणीत त्यांच्या पोटातील आतडी बाहेर आली होती, यावरूनच या कृत्याची भीषणता दिसून येते. आरोपीची मानसिकता विकृत असल्याचे दिसून येत असून, यापूर्वीही त्याच्यावर सावनेर पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा नोंद आहे. २०१८ मधील एका अशाच प्रकरणात त्याला आधी अटकही झाली होती.
घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेजची अतिशय बारकाईने तपासणी केली. त्या फुटेजमध्ये एक व्यक्ती वृद्ध महिलेला दुचाकीवर बसवून घेऊन जाताना स्पष्ट दिसली, ज्यामुळे पोलिसांच्या तपासाला एक योग्य दिशा मिळाली. तांत्रिक पुरावे, सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या मदतीने सावनेर पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सलग नऊ दिवस अथक परिश्रम करून संशयिताचा शोध लावला. आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली एमएच-४०/आर-५५२० क्रमांकाची स्प्लेंडर मोटरसायकल पोलिसांनी जप्त केली आहे.