गुजरातमध्ये सिंहाचा शेतकऱ्यावर हल्ला
Marathi July 07, 2026 01:25 PM

वर्तमानपत्र/भावनगर

गुजरातच्या भावनगर जिह्यातील पालिताना तालुक्यात सोमवारी सकाळी एका सिंहिणीने शेतकऱ्यावर हल्ला केला. शेतकरी कालूभाई बोगभाई परमार असे संबंधित शेतकऱ्याचे नाव असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. या हल्ल्याचा एक व्हिडिओ आणि काही छायाचित्रे सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. यापूर्वी रविवारीही सिंहिणीने अन्य एका माणसावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. पण त्याने पळून जात एका घरात स्वत:ला कोंडून घेत स्वत:चा बचाव केला. भावनगर हे गिर राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरात येते, जिथे घरांच्या आणि शेतांच्या आसपास अनेकदा सिंह दिसतात. या भागात नव्याने होत असलेल्या या हल्ल्यांमुळे परिसरात दहशत पसरली आहे. आता वनविभागाचे एक पथक घटनास्थळी पोहोचले असून सिंहिणीला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेनंतर, गरजिया गाव आणि आसपासच्या परिसरातील पशुपालक त्यांच्या जनावरांच्या आणि कुटुंबांच्या सुरक्षेबद्दल चिंतित आणि भयभीत झाले आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.