भारताचे 1000 रुपये न्यूझीलंडमध्ये किती होतात? आकडा ऐकून धक्का बसेल
admin July 12, 2026 01:24 AM
[ad_1]

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहेत. न्यूझीलंडच्या एकूण लोकसंख्येपैकी 6 टक्के लोकसंख्या ही भारतीय आहे. दर वर्षी न्यूझीलंडमधे तब्बल 80 हजार भारतीय लोक पर्यटनासाठी जातात. भारतीय लोक दरवर्षी न्यूझीलंडमध्ये सरासरी 11 दिवस मुक्काम करतात. अनेक भारतीय लोक असे आहेत, ज्यांचा उद्देश फक्त न्यूझीलंडमध्ये पर्यटन करणं हा नसून ते या ठिकाणी आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी देखील येतात. न्यूझीलंडला भारतीय लोकांच्या पर्यटनामधून मोठ्या प्रमाणात आर्थिक प्राप्ती होते. एका रिपोर्टनुसार न्यूझीलंड फिरण्यासाठी आलेले भारतीय लोक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करतात.

भारताचे 500 रुपये न्यूझीलंडमध्ये किती होतात?

न्यूझीलंड डॉलर हे न्यूझीलंडमध्ये वापरलं जाणारं अधिकृत चलन आहे. ज्याला सांकेतिक भाषेमध्ये NZD असं लिहिलं जातं. तर भारतीय चलनाला INR असं म्हटंलं जातं. भारतीय चलन आणि न्यूझीलंडच्या चलनाची तुलना करायची झाल्यास भारताचे शंभर रुपये न्यूझीलंडमध्ये केवळ 1.82 न्यूझीलंड डॉलर एवढेच होतात. याचा अर्थ न्यूझीलंडमध्ये भारताच्या 500 रुपयांची किंमत केवळ 9.09 न्यूझीलंड डॉलर एवढी आहे, तर भारताचे एक हजार रुपये न्यूझीलंडमधे 18.18 न्यूझीलंड डॉलर एवढे होतात.

येथील चलनावर नियंत्रण ठेवण्याचा काम रिझर्व्ह बॅक ऑफ न्यूझीलंडकडून केलं जातं. न्यूझीलंडच्या डॉलरला जगभरात किवी डॉलर म्हणून देखील ओळखलं जातं. न्यूझीलंड डॉलरची सुरुवात ही अनेक टप्प्यांमध्ये झाल्याचं दिसून येतं. ब्रिटिश शासन काळात वापरात असलेल्या चलनापासून तर आधुनिक काळात वापरात असलेल्या प्लॅस्टिकच्या नोटापर्यंत त्याचे अनेक टप्पे पडतात. न्यूझीलंडने वेळोवेळी आपल्या चलनामध्ये बदल केल्याचं दिसून येत. 1840 साली न्यूझीलंडवर ब्रिटीश शासनाची सुरुवात झाली, त्या काळात पाउंड स्टर्लिंगला न्यूझीलंडची अधिकृत मुद्रा बनवण्यात आलं होतं. त्यानंतर 1933 साली न्यूझीलंडने आपलं अधिकृत चलन म्हणून न्यूझीलंड पाउंडला मान्यता दिली, त्यानंतर त्यामध्ये हळुहळु बदल होत गेले आता न्यूझीलंडमध्ये न्यूझीलंड डॉलर हे अधिकृत चलन वापरलं जातं. न्यूझीलंडचं चलन हे भारतीय चलनाच्या तुलनेमध्ये खूप मजबूत आहे. मात्र तेथील खर्च देखील तेवढाच कॉस्टली आहे.

 

 

 


[ad_2]
Source link
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.