Kolhapur Police Raid : मुंबई-पुण्यातून आणल्या जायच्या महिला; व्हॉट्सॲप ग्रुप करून वाशीतील लॉजमध्ये सुरू होता वेश्‍याव्यवसाय, हायप्रोफाईल रॅकेटचा पोलिसांकडून पर्दाफाश
esakal July 14, 2026 02:45 AM

कोल्हापूर\सोनाळी : व्हॉट्सॲप ग्रुप तयार करून त्याद्वारे सुरू असलेल्या हायप्रोफाईल वेश्‍याव्यवसायाचे रॅकेट करवीर पोलिसांनी उघड (Karveer Police prostitution raid) केले. त्यात सागर प्रभाकर कांबळे (वय ४०, मिणचे बुद्रुक, ता. भुदरगड), कमलेश कृष्णा पाटील (वय ३५, हेळेवाडी, ता. राधानगरी) या संशयित आरोपींना अटक करण्यात आली, तर शहाजी एकनाथ वैद्य ऊर्फ सागर पाटील (हेदवडे, ता. भुदरगड), सुहास निचिते (सोळांकूर, ता. राधानगरी), विक्रम कांबळे (कासारवाडा, ता. राधानगरी) हे आरोपी अद्याप पसार आहेत. यातील पीडित महिलेची सुटका करण्यात आली. पुणे-मुंबईतून महिलांना आणून हा व्यवसाय सुरू होता.

पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी अवैध धंद्यांविरोधात कारवाई करण्याबाबत कडक निर्देश दिले आहेत. त्यानुसार करवीर पोलिस ठाण्याचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी गुन्हे शोध पथकाला वेश्‍याव्यवसाय सुरू असलेल्या लॉजिंगची माहिती काढून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलिस निरीक्षक कळमकर यांना गुप्त बातमीदाराकडून वाशीतील ‘सनराईज लॉजिंग’मध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली.

त्यानंतर पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून सापळा रचला आणि छापा टाकला. त्यात दोघांना अटक केली, तर तिघे जण सापडले नाहीत. ‘सागर पाटील फ्रेंड सर्कल’ नावाचा व्हॉट्सॲप ग्रुप बनवून त्याद्वारे पुण्या-मुंबईतून महिलांना आणून हा अवैध व्यवसाय चालवला जात होता. शहाजी वैद्य याने व्हॉट्स ॲप ग्रुपद्वारे सदस्यांशी संपर्क करून निचिते व कांबळे यांच्या मदतीने ग्राहकाकडून रोख किंवा ऑनलाईन पैसे स्वीकारले जात असल्याचे निष्पन्न झाले.

Tamil Nadu Cow Slaughter Ban : सर्वोच्च न्यायालयाकडून तामिळनाडूतील 'विजय सरकार'ला दिलासा; गोहत्या बंदीबाबत मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशाला अंतरिम स्थगिती

वाशी येथील सनराईज लॉजिंग येथे ‘सागर पाटील फ्रेंड सर्कल’ नावाचा व्हॉट्सॲप ग्रुप बनवून त्याद्वारे वेश्‍या व्यवसाय सुरू होता. त्या ठिकाणी कारवाई करून दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून ६९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तीन फरारी आरोपींचा तपास सुरू आहे. व्हॉट्सॲपग्रुपवरील सर्वांना नोटीस पाठवून त्यांची चौकशी केली जाणार आहे.

-रवींद्र कळमकर, पोलिस निरीक्षक, करवीर ठाणे.

Newly Married Woman : 2 दिवसांनी होतं मुलीचं बारसं, घरात चालू होती तयारी; पण त्याआधीच 23 वर्षांच्या 'या' उच्चशिक्षित माऊलीनं... असा सुरू होता वेश्‍याव्यवसाय

आरोपींनी व्हॉट्सॲप ग्रुप तयार करून त्यात पीडित महिलांचे फोटो पाठवून ग्राहकांना आकर्षित केले जात होते. वेश्या व्यवसायासाठी महिलांना खास पुण्या-मुंबईतून आणले जात असल्याचे समोर आले आहे.

६९ हजारांचा मुद्देमाल जप्त

आरोपींकडून ६९ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यात १३ हजार रुपये रोख व ५६ हजार रुपये किमतीचे चार मोबाईल व इतर साहित्य असा मुद्देमाल आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.