कौटुंबिक वाद विकोपाला, मुलानेच संपवलं वडिलांना, धक्कादायक घटनेनं बीड हादरलं, आरोपी पोलिसांच्या ताब्यात
स्वानंद पाटील July 28, 2026 07:13 PM

Beed Crime News : बीड जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. वडवणी तालुक्यातील चिंचवन येथे कौटुंबिक वादातून मुलाने वडिलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. श्रीकिसन कोठुळे असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर या प्रकरणी मुलगा फुलचंद कोठुळे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री कोठुळे कुटुंबात कौटुंबिक कारणावरून वाद सुरु होता. त्यावेळी श्रीकिसन कोठुळे हे भांडण सोडवण्यासाठी आले होते. यावेळी फुलचंद कोठुळे यांनी अंगणात पडलेली वीट त्यांच्या डोक्यात मारली. यामुळे गंभीर जखमी झाल्याने श्रीकिसन कोठुळे यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणात वडवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फुलचंद कोठुळे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास पोलीस करत आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.