ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जुलै 2026 | मंगळवार
युवराज जाधव July 28, 2026 08:43 PM

1. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चा शरद पवारांनी फेटाळल्या, काही संबंध नाही म्हणत चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न https://tinyurl.com/246auhvu  मोदी-पवारांच्या भेटीच्या दुसऱ्याच दिवशी पार्थ पवार आणि प्रफुल पटेलांनी घेतली शरद पवारांची भेट, पटेलांचा भेटीच्या वृत्ताला दुजोरा, विलिनीकरणाबाबत चर्चांना पुन्हा वेग https://tinyurl.com/mr34j2xn  मी कधीच एनडीएसोबत जाणार नाही, रोहित पवारांची ठाम भूमिका https://tinyurl.com/yshj3pa7   

2. धर्मेंद्र प्रधानांना हटवून पंतप्रधानांना वाचवलं, दान चोरी रोखू न शकणारे पेपर लीक कसे रोखणार?,अखिलेश यादव यांचा लोकसभेत सवाल https://tinyurl.com/3efx2pru   नीट पेपरफुटीची जबाबदारी घेत प्रधानांनी राजीनामा दिला, विरोधकांमुळं नाही, श्रीकांत शिंदेंचा टोला https://tinyurl.com/mtvf9fnk  संसदेत प्रधानांचं असं स्वागत केलं जसा काय सुपरस्टार आला, नरेंद्र मोदींनी कॅमेऱ्याचा नव्हे ह्रदयाचा अँगल बदलावा, प्रियांका गांधी यांचं पेपरफुटीविरोधातील विधेयकावर जोरदार भाषण https://tinyurl.com/5c9nfzd8  

3. धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर दिल्ली पोलीस अडचणीत, विद्यार्थी आंदोलकांवरील लाठीमाराची चौकशी करण्यास सुप्रीम कोर्टाची परवानगी, महाराष्ट्रासह 7 राज्यांना नोटीस https://tinyurl.com/2a769cab   फेसबुकने अचानक पंतप्रधान मोदींचा 'सेल्फी मोड'वाला व्हिडीओ हटवला, गदारोळ होताच निर्णय फिरवला, तांत्रिक चुकीचं कारण देत माफीनामा https://tinyurl.com/tp7jrwk6 

4. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीमध्ये राखीव जागांवरील विजयी उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 8 मोठे निर्णय https://tinyurl.com/yc3d73vb 

5. शेतकरी कर्जमाफीची यादीमध्ये गोंधळ; कर्ज माफीच्या यादीतील रक्कम, केवायसीवरील रक्कम अन् कर्जांच्या रकमेमध्ये तफावत, शेतकऱ्यांचा संताप https://tinyurl.com/njvt9ehf  बँकांना शेतकऱ्यांचं दोन लाखांपर्यंतचं कर्ज माफ करावं लागेल, कृषी मंत्री दत्रात्रय भरणेंची माहिती  https://tinyurl.com/5n8j7ent 

6. आमचा संयम सुटत चाललाय, आम्हाला उत्तर पाहिजे...; अजित पवारांच्या विमान दुर्घटनेला सहा महिने झाले काहीच समोर आलं नाही, युगेंद्र पवारांचा संताप, व्हीएसआरच्या मालकावर गुन्हा न नोंद झाल्याने आक्रोष  https://tinyurl.com/29eksbw9 

7. शालार्थ आयडी घोटाळ्यात मोठी कारवाई, जळगावातील भाजप पदाधिकाऱ्याला सोलापुरातून अटक; शासनाची 160 कोटींची फसवणूक https://tinyurl.com/5auv2678 

8. नितीन गडकरींची E20 संदर्भातील डीपफेक व्हिडिओंच्या मुद्यावर मेटा, गुगलविरुद्ध न्यायालयात धाव, मुंबई हायकोर्टात 5 ऑगस्टला पुढील सुनावणी https://tinyurl.com/yc4p5afz 

9. 'गटार छाप, आई-बापाच्या जीवावर ऐश, ड्रग्ज, दारू घेणाऱ्या, कित्येकांसोबत शारीरिक संबंध ठेवणाऱ्या...'; विद्यार्थी आंदोलनातील हिंदू तरुणींबाबत अभिनेत्री आणि  भाजप खासदार कंगना रनौत नको नको ते बरळली https://tinyurl.com/mchrd9sm 

10. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, रवींद्र जाडेजाचं कमबॅक, केएल राहुलची उपकर्णधारपदी वर्णी https://tinyurl.com/4kec6mmn  मध्य प्रदेशच्या 33 वर्षीय सारांश जैनला टीम इंडियात संधी, वॉशिंग्टन सुंदरच्या जागी निवड  https://tinyurl.com/wpscwrmc 

एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.