आलिया भट्टची बेस्ट फ्रेंड झाली मम्मी; जुळ्या मुलींना दिला जन्म, गुड न्यूज शेअर करत बाळांचं नावही सांगितलं...
भाग्यश्री कांबळे August 24, 2026 01:43 PM

Aditya Seal and Anushka Ranjan:  बॉलिवूडमधून एक आनंदाची बातमी समोर येत आहे.  'स्टूडेंट ऑफ द इअर 2' फेम आदित्य सील (Aditya Seal) आणि त्याची पत्नी अनुष्का रंजन यांच्या आयुष्यात नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे.  बी - टाऊनच्या पँरेट क्लबमध्ये या कपलची एन्ट्री झाली आहे.  अनुष्काची खास मैत्रिण आलिया भट्ट असून,  अनुष्काला जुळी झाल्यानंतर आलिया मावशी बनली आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.  अनुष्का आणि आदित्यने मे महिन्यांत एकत्र इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करुन प्रेग्नेंसीची माहिती दिली.  आता कपलने आपल्या चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे.   कपलला एक नाही तर, डबल आनंद झाला आहे.  IVFच्या माध्यमातून कपलला जुळी मुलं झाली आहेत. त्यांनी याची माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे. अनुष्का आणि आदित्यने जॉइंट पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांबरोबर ही गुडन्यूज शेअर केली आहे.

आदित्य आणि अनुष्का या कपलला झाला डबल आनंद (Aditya Seal and Anushka Ranjan welcome twin daughters)

आदित्य आणि अनुष्काने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.    या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं की,   त्यांच्या  आयु्ष्यात जुळ्या मुलांचं आगमन झालं आहे.  आदित्य आणि अनुष्का या दोघांनाही दोन जुळ्या मुली झाल्या आहेत. या कपलने आपल्या जुळ्या मुलांची नावेही सांगितली.  वीरा आणि माही असं त्यांनी आपल्या मुलींची नावे ठेवली आहेत.  त्यांची इन्स्टाग्राम पोस्ट सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.  जुळ्या मुलींच्या जन्मानंतर दोघांना किती आनंद झाला आहे, हे कपलच्या इन्स्टाग्राम पोस्टवरुन दिसून येत आहे.  सध्या आदित्य आणि अनुष्का यांची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

आदित्य आणि अनुष्का यांनी एक जॉइंट पोस्ट आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केली आहे.  त्यांनी पोस्ट शेअर करुन, या पोस्टला कॅप्शनही दिलं आहे.  त्यांनी आपल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हटलं की, 'ही बातमी  तुमच्यासोबत शेअर करताना आम्हाला प्रचंड आनंद होत आहे. 23.8.2026 रोजी आमच्या जुळ्या मुलांचा जन्म झाला. वीरा आणि माहीचं स्वागत करताना आमचे हृदय आनंदाने भरुन गेले आहे', असं म्हणत या कपलने चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली आहे. 

दरम्यान, आदित्य आणि अनुष्का यांची ही पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे. कमेंट्स सेक्शनमध्ये आदित्य आणि अनुष्का या जोडप्यावर आनंद आणि अभिनंदानाचा वर्षाव होत आहे.  आकांक्षा रंजन कपूरपासून ते सोहा अली खान, कुणाल कपूर, प्रिया बॅनर्जी, अनुषा दांडेकर, भूमी पेडणेकर या कलाकारांनीही कमेंट करुन या जोडप्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'द कपिल शर्मा'शोच्या कॉमेडियनवर दु:खाचा डोंगर; प्रसिद्ध अभिनेत्याच्या वडिलांचे निधन, कृष्णा अभिषेकने दिली माहिती

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.