एक-दोन नव्हे तर अस्खलित इंग्लिशसह तब्बल 19 भाषांवर प्रभुत्व, ट्रेनमध्ये टूथब्रश विक्रेत्याच्या व्हिडिओची नेटकऱ्यांना भुरळ, म्हणाले 'हाच खरा भारत'
विशाल देवकर August 24, 2026 03:43 PM

Train Vendor Expert In 19 Languages: ट्रेनचे प्रवास अनेकदा कंटाळवाणे असतात, पण कधीकधी ते अशा प्रतिभावान व्यक्तींना सोबत घेऊन येतात जे प्रवासाचे वातावरण पूर्णपणे बदलून टाकतात. असेच एक आश्चर्यकारक दृश्य तेव्हा पाहायला मिळाले, जेव्हा ट्रेनमध्ये टूथब्रश, टूथपेस्ट आणि साबण विकणारा एक साधा विक्रेता अचानक अस्खलित इंग्रजी बोलू लागला. या माणसाचा दावा आहे की तो केवळ एक-दोन नव्हे, तर 18 ते 19 भाषा बोलतो. त्याच्या या क्षमतेने ट्रेनमधील प्रवासी पूर्णपणे थक्क झाले. सध्या बहुभाषिक विक्रेत्याचा व्हिडीओ (Viral Video) समाज मध्यमांवर व्हायरल होत आहे. (Train Vendor Speaking 18 Languages Viral Video)

Train Vendor Speaking 18 Languages: अस्खलित इंग्रजीसह 18-19 भाषा येत असल्याचा दावा

'एक्स' (X) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अक्षय मेहता नावाच्या वापरकर्त्याने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये, एक विक्रेता डब्यात वस्तू विकताना दिसत आहे. एका प्रवाशाने त्याच्या उत्पादनांबद्दल आणि त्याच्या पार्श्वभूमीबद्दल चौकशी केली. विक्रेत्याने सांगितले की तो राजस्थानचा असून त्याला 18-19 भाषा येतात. जेव्हा तो प्रवाशांशी अस्खलित आणि आत्मविश्वासाने इंग्रजीमध्ये बोलू लागला, तेव्हा प्रत्येकजण आपली खरेदी विसरून फक्त त्याचं म्हणणं ऐकू लागलेत.

Viral Video: कोणत्याही कोचिंगशिवाय स्वतःहून अनेक भाषेवर प्रभुत्व

संभाषणादरम्यान, त्या व्यक्तीने भारतातील विविध प्रादेशिक भाषांबद्दल सांगितले आणि त्यांच्यातील साम्य स्पष्ट केले. जेव्हा प्रवाशांनी विचारले की त्याने इतक्या भाषा कुठून शिकल्या, तेव्हा त्याने स्पष्ट केले की त्याने कोणत्याही प्रतिष्ठित क्लासेस किंवा कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षण घेतलेले नाही. त्याने त्या सर्व भाषा स्वतःहून, शिकण्याच्या त्याच्या सततच्या इच्छेतून आणि वेगवेगळ्या लोकांशी संवाद साधून शिकल्या. भाषा शिकणे हे त्याचे केवळ काम नाही, तर एक खरी आवड आहे. सध्या या प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून या विक्रेत्यांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे, लोक म्हणत आहेत, "हाच खरा भारत आहे."

Train Vendor Viral Video : व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, नेटकरी म्हणाले, 'हाच खरा भारत'

हा व्हिडिओ सोशल मीडियावर येताच त्याने लोकांच्या हृदयाला स्पर्श केला. नेटकऱ्या या विक्रेत्याची आवड, मेहनत आणि शिकण्याच्या इच्छेची प्रशंसा करत आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले, "हा माणूस सतत शिकण्याचे आणि कठोर परिश्रमाचे सर्वोत्तम उदाहरण आहे." दुसऱ्या एकाने टिप्पणी केली, "आम्हाला असा भारत पाहायचा आहे, जिथे प्रतिभा, जिज्ञासा, साधेपणा आणि कठोर परिश्रम एकत्र नांदतात."

इतर महत्वाच्या बातम्या

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.