पत्नीची हत्या करुन पळ काढला, पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली, 24 तासात आरोपीला बेड्या; हत्येचं धक
Marathi September 20, 2024 11:25 PM

मुंबई गुन्हे: वयातील फरकामुळे होणाऱ्या वादातून संतप्त झालेल्या पतीने आपल्या पत्नीची चाकूने हत्या केली. हा खळबळजनक प्रकार दिवा परिसरात घडली असून आरोपीने हत्या केल्यानंतर घटनास्थळावरून पलायन केले होते. मात्र मुंब्रा (Mubra Police) पोलिसांनी विशेष टीम तयार करत 24 तासांच्या आत आरोपी पतीला रत्नागिरी जिल्ह्यातील मुळगावी देव्हारे गावातून बेड्या ठोकल्या आहेत.  प्रितेश काशीनाथ शिर्के (वय 37) वर्ष असे या हत्या करणाऱ्या पतीचे नाव असून पत्नी द्रोपदी प्रितेश शिर्के (वय 47) असे मयत पत्नीचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार दोघात दहा वर्षाचा अंतर असल्याने या दोघात वाद होत होता, याचा राग डोक्यात ठेवून प्रितेशने राहत्या घरात चाकू हल्ला करत पत्नी द्रोपदीची हत्या केली होती. सध्या पोलिसांनी प्रितेशला न्यायालयात हजर केले.  न्यायालयाने 22 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून मुंब्रा पोलीस अधिक तपास करत आहे.

सराईत चोरट्याला सिसिटीव्हीच्या मदतीने मुंब्रा पोलिसांनी ठोकल्या बेड्या

मौजमस्ती आणि नशेसाठी चोरीच्या मोटारसायकलवरून सोनसाखळी चोरणाऱ्या सराईत चोरट्याला सिसिटीव्हीच्या मदतीने मुंब्रा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. शेख असे या चोरट्याचे नाव असून तो आपल्या मित्राच्या मदतीने आधी मोटर सायकल चोरी करायचा व त्यानंतर त्याच मोटरसायकलवर बसून हे दोघे चोऱ्या करायचे. रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या वयोवृद्ध महिला पुरुष व ज्येष्ठ नागरिकांची रेखी करत धूम स्टाईलने त्यांच्या गळ्यातील मूल्यवान सोन्याच्या वस्तू लंपास करायचे. अशीच एक घटना 7 जुलै 2024 सकाळी कबुतरांना खाणे चारण्यासाठी दिवा नाका येथे आलेले रामदास बामा म्हात्रे (वय 52) ज्येष्ठ नागरिक मैदानात जात असताना दोन चोरट्यांनी मोटारसायकलवरून त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून पळ काढला. प्रकरणी मुंब्रा पोलीस चौकात गुन्हा दाखल झाल्यानंतर मुंब्रा पोलिसांनी आजू बाजूचे सीसीटीव्ही तपासून त्याच्या आधारावर कळवा परिसरात सापळा रचत कलीम हारुन शेख (वय 20)याला बेड्या ठोकल्या. याच्याकडे चौकशी केली असता त्यांही आपल्या साथीदाराच्या सोबत चोरीची कबुली दिली. सध्या याप्रकरणी पोलिसांनी या आरोपीला ताब्यात घेत त्याच्याकडून एक लाख वीस हजाराची चोरीची साखळी जप्त केली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.