Kareena Kapoor : वडिलांच्या मर्जीविरुद्ध बनली अभिनेत्री ; सुपरहिट सिनेमे बघून मन बदललं म्हणाले - मला मुलीचा गर्व...
esakal September 21, 2024 07:45 AM

Bollywood Entertainment News : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान काही ना काही कारणामुळे चर्चेत असते. करीना सध्या चर्चेत आहे तिच्या द बकिंगहॅम मर्डर्स या सिनेमामुळे. आज 21 सप्टेंबरला करीनाचा वाढदिवस आहे. जाणून घेऊया करीनाविषयी काही खास गोष्टी.

Kareena Kapoor Khan: मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने करीना कपूरला बजावली नोटीस, नेमकं प्रकरण काय?

करीना कपूर आज बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. पण तुम्हाला माहितीये का ?करीनाच्या वडिलांना रणधीर कपूर यांना तिने अभिनेत्री व्हावं असं वाटत नव्हतं. असं म्हणतात कि, करीना लहानपणी खूप मस्तीखोर होती. तिला खोड्या काढायला खूप आवडायचं. लहानपणापासून करीनाला सिनेमा पाहणं आवडायचं आणि तिला फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करायचं होतं. पण तिच्या वडिलांना तिने इंडस्ट्रीत काम करावं असं वाटत नव्हतं.

करीना कपूर खानला नर्गिस आणि मीना कुमारी या अभिनेत्री खूप आवडायच्या आणि त्यांच्यासारखं सिनेइंडस्ट्रीत काम करावं असं तिला वाटत होतं. पण करीनाच्या वडिलांनी तिला अभिनयक्षेत्रात काम करण्याची परवानगी नाकारली. त्यांना असं वाटायचं कि, कुटूंबातील महिलांनी जर सिनेइंडस्ट्रीत काम केलं तर घराकडे त्या दुर्लक्ष करू शकतात.

Kareena Kapoor : पापाराझीसमोरच करीना-सैफने केलं किस ; व्हिडीओ पाहून चाहते म्हणतात..

मात्र, करीनाचे वडील राजी नसल्यामुळे तिच्या पालकांमध्ये वाद झाला आणि दोघेही वेगळे राहू लागले. करीना कपूरच्या आईने तिला वाढवले आणि तिच्या मुलींसाठीही काम केले. तथापि, रणधीर कपूर स्वतः एकदा म्हणाले होते की, आज त्यांच्या मुली जे काही आहेत ते त्यांच्या मेहनतीमुळे आहेत.

जरी रणधीर कपूर यांनी त्यांच्या मुलींना फिल्म इंडस्ट्रीत काम करण्याची परवानगी दिली नसली तरीही आज त्यांनी फिल्म इंडस्ट्रीत स्वतःचं जे काही स्थान निर्माण केलं त्याचा त्यांना खूप गर्व आहे. रणधीर कपूर यांनी हे सुद्धा कबूल केलं कि, त्यांची पत्नीच त्यांच्या मुलींची खरी मार्गदर्शक आहे आणि आज तिच्यामुळेच त्या इतक्या यशस्वी आहेत.

Kareena Kapoor : 'आमच्या पिढीतले कलाकार जास्त मेहनती, आताचे फक्त....!' करिना कपूरनं नव्या सेलिब्रेटींचे टोचले कान
© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.