Sanjay Raut : शरद पवार यांच्याकडे चुकीची माहिती, संजय राऊत यांचं पवारांना पहिल्यांदाच प्रत्युत्तर; कारण काय?
Shital Mandal September 23, 2024 01:54 AM

विधानसभा निवडणुकीपूर्वी जागा वाटपावर मंथन सुरू आहे. तर एका जागेवर तीनही पक्षांनी दावेदारी केल्याने त्याठिकाणी चर्चेअंती निर्णय होणार आहे. पण  श्रीगोंद्यात बोलताना संजय राऊत यांनी पुढचा आमदार ठाकरे गटाचाच राहिल असे वक्तव्य चर्चेत आले होते. त्यावर शरद पवार यांनी बारामतीत प्रतिक्रिया दिली. उमेदवाराची अशी घोषणा करणे चुकीचे असल्याचे पवार म्हणाले. त्यावर आता शरद पवार यांच्याकडे चुकीची माहिती, संजय राऊत यांचं पवारांना पहिल्यांदाच प्रत्युत्तर दिलं आहे.

केंद्रावर साधला निशाणा

निरीक्षक मुंबईत येत आहेत. विधानसभेच्या निवडणुका कधी घ्यायचा विचार करत आहेत. झारखंड आणि हरियणासोबत महाराष्ट्राच्या निवडणुका घ्यायला हव्या होत्या. एक देश एक निवडणुका घेणार होते. त्यांना चार राज्यांच्या एकत्रित निवडणुका घेता येत नाही. आता निरीक्षक येतील पडद्या आड चर्चा होतील, असे ते म्हणाले.

पवार यांच्याकडे चुकीची माहिती

शरद पवार यांच्याकडे चुकीची माहिती आहे. पवारांकडे श्रीगोंदाबाबत चुकीची माहिती आहे. प्रत्येक पक्ष आपल्या उमेदवारांना काम करण्यासाठी संदेश देत असतो. २८८ मतदारसंघात आपली तयारी आहे. कागलला सचिन घाडगे आहेत. अनेक मतदारसंघात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांना आदेश देतात तयारी करतात. श्रीगोंद्यात काय घडतं माहीत नाही. पण महाविकास आघाडीचा उमेदवार जिंकणार आहे. कुणीही कोणती तयारी केली नाही. पण आम्ही कार्यकर्त्यांना तयारीला लागा, कामाला लागा, पुढे व्हा असा संदेश दिला तर चुकीचं नाही. हेच संदेश पवार आणि नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांना दिला असेल तर त्यात चुकीचं नाही, असे म्हणाले.

काय होते राऊतांचे वक्तव्य

संजय राऊत यांची  श्रीगोंद्यात सभा झाली. त्यात राऊत यांनी श्रीगोद्यांतील पुढचा आमदार ठाकरे गटाचाच असेल, असे त्यांनी जाहीर केले होते. तर या मतदारसंघातून राहुल जगताप हे राष्ट्रवादीकडून इच्छुक असल्याचे समोर आले आहे. महाविकास आघाडीतील तीन ही पक्ष मिळून उमेदवार ठरवतील. त्यामुळे खासदार संजय राऊत यांनी एकट्याने उमेदवार जाहीर करणे बरोबर नसल्याचे शरद पवार यांनी म्हटले होते.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.