Maharashtra News Live Updates : खासदार श्रीकांत शिंदेंनी वरळीत घेतला लाडकी बहिण योजनेचा आढावा
Saam TV September 23, 2024 03:45 AM
MP Shrikant Shinde : खासदार श्रीकांत शिंदेंनी वरळीत घेतला लाडकी बहिण योजनेचा आढावा

खासदार श्रीकांत शिंदे यांनी वरळतील बैठकीत लाडकी बहिण योजनेचा महिला पदाधिकारी आणि नगरसेवकांकडून आढावा घेतला. तक्रारी- हेवेदावे बाजूला ठेवून, चांगले काम करा. वरळी या मतदारसंघात ५ हजारांचा गॅप आहे. चांगल काम केल तर तो गॅप आपण भरून काढू, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.

Pune News : मोहम्मद पैगंबर जयंती जुलूसमध्ये विजेचा धक्का लागून २ तरुणांचा मृत्यू

पैगंबर जयंतीच्या जुलूसमध्ये विजेचा धक्का लागून दुसऱ्या तरुणाचाही मृत्यू झाला आहे. पुण्यातील वडगाव शेरी भागात ही दुर्दैवी घटना घडली आहे. मिरवणूक रथावर चढवून झेंडा फिरवणाऱ्या दोन तरुणांचा यात मृत्यू झाला आहे.

नाशिकमध्ये जोरदार पावसाला सुरुवात

नाशिकमध्ये जोरदार पावसाला सुरुवात

उद्यापासून दमदार सरींचा वर्षाव चा इशारा

अंदमानहुन कमी दाबाचा पट्टा राज्याकडे सरकणार

सोमवारपासून नाशिकमध्ये मध्यम ते तीव्र स्वरूपाच्या पावसाचा अंदाज

तर गुरुवारपासून पुढे रविवार पर्यंत नाशिक सह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढू शकतो

अंदमान बेटाच्या उत्तरेकडे कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊन ते महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल करण्याची शक्यता

परतीच्या पावसाचा हवामान खात्याकडून अंदाज

15 दिवसात आचारसंहिता लागेल

15 दिवसात आचारसंहिता लागेल आणि त्यानंतर निवडणुका,त्यामुळे पाहिल्यासारखे सोलापूर जिल्ह्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निवडून आले पाहिजे - अजित पवार

माणगाव ST डेपोच्या नवीन इमारतीचे मंत्री आदिती तटकरे आणि भरत गोगावले यांच्या हस्ते भुमीपुजन

माणगाव ST स्टँडच्या नवीन इमारतीचे भुमीपुजन मंत्री आदीती तटकरे आणि आ. भरत गोगावले यांच्या हस्ते संपन्न झाले. माणगाव ST स्टँडसाठी सुमारे 1 कोटी रुपये खर्च करून नवीन सुसज्ज इमारत उभारली जाणार आहेे. मुंबईसह कोकण, पश्चिम महाराष्ट्रात जाणाऱ्या प्रवाशांसाठी माणगाव हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने प्रवाशांच्या सुविधांसाठी ST स्टँडचे नुतनीकरण केले जात आहे. बारामतीच्या धरतीवर सुसज्ज असे बस स्थानक व्हावे अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. त्यासाठी आदितीला किंवा मला वित्तमंत्री बनावे लागेल अस मिश्किल बोलताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.

Maharashtra News Live Updates : ठाकरे-शिंदे यांचे कार्यकर्ते आमनेसामने, कांदिवलीत तणाव

मुंबईच्या कांदिवली पूर्वेकडील महिंद्रा अँड महिंद्रा 90 रोडवर भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने मोठा तणाव निर्माण झाला. याप्रकरणी पोलिसांनी हस्तक्षेप करून घोषणाबाजी करणाऱ्या दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांना बाजूला केल्याने मोठा संघर्ष टळला. कांदिवली लोखंडवाला ते सिंग इस्टेट पर्यंत रस्ता व्हावा आणि नागरिकांचे त्याच ठिकाणी पुनर्वसन व्हावे यासाठी भाजप आमदार प्रकाश सुर्वे यांनी आज आंदोलन केले यावेळी शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांचे कार्यकर्ते देखील त्या ठिकाणी आल्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

Solapur News: माढ्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात उमेदवारीचा तिढा कायम

माढ्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात उमेदवारीचा तिढा कायम आहे. संजय कोकाटे यांनी उमेदवारी मागणी केली. होय मला आमदार व्हायचय अशा आशयाची मतदार संघात कोकाटेंकडून पोस्टरबाजी करण्यात आली आहे.

Solapur News: मराठा बांधव अजित पवारांना देणार निवेदन, वैराग फाट्यावर पोलिसांचा बंदोबस्त

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन देण्यासाठी मोहोळमध्ये मराठा बांधव वैराग फाटा येथे एकत्र आले आहेत. थोड्याच वेळात अजित दादांचा ताफा मोहोळहुन नगरकडे रवाना होणार आहे. मराठा आंदोलक एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देत आहेत. वैराग फाट्यावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Mumbai News: शिवस्मारकासाठी संभाजी ब्रिगेडच्या शिष्ट मंडळाने घेतली राज्यपालांची भेट

राजभवनावर शिवस्मारक व्हावं यासाठी संभाजी ब्रिगेडच्या शिष्ट मंडळाने राज्यपालांची भेट घेतली. चर्चेसाठी राजभवनाकडून संभाजी ब्रिगेडच्या शिष्टमंडळाला आमंत्रण मिळालं होतं.

यवतमाळ जवळ ट्रॅव्हल्सची ट्रकला धडक,धडकेत दोन जण ठार तर दोन जण गंभीर जखमी जालन्यात मराठा आंदोलकांकडून टायर जाळून सरकारचा निषेध...

जालना शहरातील नवीन मोंढा परिसरामध्ये मराठा आंदोलकांनी टायर जाळून सरकारचा निषेध केलाय. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाकडे सरकार मुद्दामून दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केलाय.मनोज जरांगे यांच्या उपोषण आंदोलनाचा आजचा सहावा दिवस आहे परवा त्यांनी उपचार घेतल्यानंतर काहीशी तब्येत बरी असली तरी त्यानंतर त्यांनी पुन्हा उपचार घेतलेले नाहीत, त्यामुळे सरकारने त्यांच्या मागणीची तात्काळ दखल घ्यावी अशी मागणी आंदोलकांनी केलीय.

वेतनवाढीची अंमलबजावणी रखडल्याने अंगणवाडी सेविकांचे उद्यापासून बेमुदत उपोषण Nashik News: -नाशिकमध्ये भाजपचे आदिवासी कार्यकर्ता संमेलन
  • केंद्रीय मंत्री भुपेंद्र यादव यांच्या उपस्थितीत संमेलनाला सुरुवात

  • राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित, माजी केंद्रिय राज्य मंत्री भारती पवार, नरहरी झिरवाळ आणि ईतर लोकप्रतिनिधीचीही हजेरी

  • भाजप महाराष्ट्र प्रदेश पातळीवरील आदिवासी कार्यकर्ते उपस्थित

  • संमेलनानंतर भुपेंद्र यादव भाजप पदाधिकाऱ्यांशीही साधणार संवाद

Ajit Pawar Speech Solapur: 'विकासासाठी आणि कामासाठी सरकारमध्ये गेलो..,' अजित पवार

आम्ही मजा करायला आणि मिरवनुका काढून जल्लोष करायला येत नाहीये.

आम्ही कधी चुनावी जुमला केला नाही

2004 निवडणूकीच्या आधी सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री होते तेंव्हा मी नावखा होतो

*तेंव्हा शेतकऱ्यांना वीज बिल माफी करायची असं जाहीरनाम्यात म्हटलं गेलं

शेतकऱ्यांची मत घेऊन आम्ही सत्तेवर आलो

त्यानंतर काँग्रेस ने विलासराव यांना मुख्यमंत्री केल

लोकांनी वीज बिल माफिच्या नावाने मत दिली तेंव्हा लोक तोंडातला शेण घालतील असं मी म्हटल होत

मात्र विलासरावंनी ते सुशीलकुमार शिंदे यांचा निर्णय होता असं म्हणाले..

Indapur News: मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ पुण्याच्या इंदापूरात रास्ता रोको

मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसले आहे.जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ पुण्याच्या इंदापूर शहरात जुन्या पुणे सोलापूर मार्गावर बस स्थानकासमोर सकल मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी एक मराठा लाख मराठा तुमच आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय अशा घोषणा देण्यात आल्या.यावेळी इंदापूर पोलिसांच्या वतीने मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Andheri News: अंधेरीचा राजा गणपती विसर्जन वेळी बोट पलटली,

अंधेरी राजाच्या विसर्जनाला गालबोट

अंधेरीचा राजा गणपती विसर्जन वेळी बोट पलटली

बोटं पलटल्याने अनेकजण समुद्रात पडले

काही गणेश भक्त किनाऱ्याकडे पोहत सुखरूप आले

ज्यांना पोहता येत नव्हते अशा कार्यकर्त्यांना कोळी बांधवांच्या लहान बोटीने सुखरू बाहेर काढले

Ahmednagar Accident: कंटेनर आणि दुचाकीचा अपघात; १ जण ठार, एक जखमी

कोपरगाव शहरातील पुणतांबा फाट्याजवळ एका कंटरने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकी वरील दोघांपैकी एकाचा जागीच मृत्यु झाला.. तर दुसरा इसम गंभीर जखमी झाला आहे.. अपघात घडताच परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली आणि जखमी इसमास जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलंय.. नगर मनमाड महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे छोट्या मोठ्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे..

Navi Mumbai News: नवी मुंबईत सकल मराठा समाजाचे आत्मक्लेश आणि अन्नत्याग उपोषण

नवी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकल मराठा समाजातर्फे आत्मक्लेश आणि अन्नत्याग उपोषण करण्यात येतंय. मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी हे आंदोलन करण्यात येतंय. नवी मुंबईत सगसोयरे अधिसूचनेचे आश्वासन देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा आरोप करत सरकारने तात्काळ मराठ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी यावेळी मराठा उपोषणकर्त्यांनी केलेय.

उद्या अहमदनगर जिल्हा बंदची हाक...

सकल मराठा समाजाच्या वतीने अहमदनगर जिल्हा बंदची हाक..

मनोज जारांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा म्हणून बंदची हाक...

अहमदनगर शहरात सुरू आहे गेल्या दोन दिवसापासून आमरण उपोषण...

सगे सोयरे अधिसूचनेच्या अंमलबजावणी करा, हैदराबाद गॅझेट लागू करा, सातारा गॅझेट लागू करा, बॉम्बे गव्हर्मेंट गॅझेट लागू करा, मराठा बांधवांवर दाखल झालेले म्हणून मागे घ्या अशा विविध मागण्यांसाठी उपोषण आणि बंदचे आयोजन...

सोलापूरमध्ये मराठा समाजाच्या आंदोलकांनी अजित पवारांचा ताफा अडवला - चाकण औद्योगिक क्षेत्रातील मर्सिडीज बेंझ कंपनीला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची नोटीस सत्यपाल मलिकमहाराष्ट्राच्या परिस्थितीवर चर्चा झाली. येथछे भाजप हरणार आहे. उद्धव ठाकरे सरकार बनवतील असा विश्वास आहे. हरियाणा बरोबर महाराष्ट्राचा इलेक्शन होणार होतं, मात्र दिल्ली घाबरली की महाराष्ट्रात आपण हरणार म्हणून निवडणुका एकत्र घेतल्या नाहीत. निवडणुका उशिरा झाल्या तरी एकत्र लढा एका विरोधात एक उमेदवार द्या. तडजोड करून लढा. यांच्या प्रचारात तसेच विजय मिरवणुकीत देखील मी येणार. माझं पूर्ण समर्थन आहे. भाजपचा महाराष्ट्रासह देशात सफाया होणार आहे. उद्धव ठाकरे यांची भूमिका सगळ्यात महत्त्वाची असणार बीड - अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटारसायकलस्वार ठार

बीडच्या अहमदपूर - अहमदनगर महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटार सायकलस्वार जागीच ठार झाला आहे. ही दुर्दैवी घटना बीडच्या लिंबागणेश येथे घडली आहे..विजय प्रल्हाद विघ्ने वय 35 रा .वाघिरा ता.पाटोदा जि.बीड असे मयत दुचाकीस्वाराचे नाव आहे.. दरम्यान अपघात होताच घटनास्थळी मोठा जमाव जमला होता. त्यानंतर नेकनूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, घटनास्थळाचा पंचनामा केला असून अज्ञात वाहनावर गुन्हा दाखल करण्यात आलाय..

जोगेश्वरी विधानसभेवर भाजपचा दावा

अनेक वर्ष जोगेश्वरी विधानसभेत वायकर आमदार म्हणून निवडून आलेत

आता वायकर खासदार झाल्याने हि जागा रिक्त आहे

आता भाजपने या जागेवर दावा दाखवला केला असून माजी नगरसेविका उज्जवला मोडक इच्छूक आहेत

वायकर आणि मोडक जुने विरोधक आहेत तरीही लोकसभेत भाजपने वायकराना निवडून येण्यासाठी मदत केलीय

माजी नगरसेविका उज्ज्वला मोडक यांनी कार्यकर्त्यासह नुकतीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती

माजी राज्यपाल सत्यपाल मलिक उद्धव ठाकरेंच्या भेटीला मातोश्रीवर दाखल, दोन्ही नेत्यांमध्ये इंडिया आघाडी तसेच इतर राजकीय विषयावर चर्चा होणार असल्याची माहिती. पुण्यात अपघात

पुण्याच्या राजगड तालुक्यातील वेल्हे ते चेलाडी रस्त्यावर मार्गासनी येथे साईड पट्ट्या न भरल्यामुळे, समोरून आलेल्या वाहनाला साईड देत असताना डंपर पलटी झाल्याची घटना

चालकाने प्रसंगवधान दाखवून उडी मारल्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवित हानी

रस्त्याला वळणे जास्त आहेत आणि वळणावर झाडे झुडपे वेली वाढलेल्या आहेत त्यातच साईड पट्ट्याही भरलेल्या नाहीत.. या सर्व गोष्टीकडे सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करत असल्यानं नागरिकांची नाराजी..

सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या दुरावास्थेकडे लक्ष घालून, रस्त्याचं कामं लवकरात लवकर करावं, नागरिकांची मागणी..

रस्तारोको केल्यामुळे मराठा समाजाच्या आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात

छत्रपती संभाजी नगर ब्रेक..

छत्रपती संभाजी नगर मध्ये सकल मराठा समाजाने रस्ता रोको केल्याप्रकरणी आता पोलिसांनी मराठा आंदोलकांना ताब्यात घेतलेलं आहे..

केंब्रिज चौकात मागील एक तासापासून हे आंदोलन सुरू होतं

पुण्यात २६ सप्टेंबरपासून सिव्हील कोर्ट ते स्वारगेट मेट्रो सुरु होणार

पुण्यात २६ सप्टेंबरपासून सिव्हील कोर्ट ते स्वारगेट मेट्रो सुरु होणार

अंडरग्राउंड मेट्रोचे काम पूर्ण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार लोककर्पण सोहळा

यावेळी स्वारगेट कात्रज भुयारी मार्गाचे भूमिपूजन होणार

कसबा पेठ,मंडई,स्वारगेट तीन मेट्रो स्थानके प्रवाशांसाठी खुली होणार

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुण्यातील एस पी महाविद्यालयाच्या मैदानावर सभा ही होणार आहे.

Ahmedngar News : नगर-दौंड मार्गावर रस्ता रोको आंदोलन; वाहनांच्या लांबच लांब रांगा

साकळाई उपसा जलसिंचन योजना जनआंदोलन समितीच्या वतीने नगर-दौंड मार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं. त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. परिणामी वाहनचालकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला. सध्या पोलिसांकडून आंदोलकांना हटवण्यात येत आहे.

Kolhapur News : कमरेला पिस्तूल लावून फिरणाऱ्याला करवीर पोलिसांनी केली अटक

कायदेशीरित्या गावठी बनावटीचे पिस्तूल जवळ बाळगून फिरणाऱ्या एकाला बाचणी येथून करवीर पोलिसांनी अटक केलीय. ऋत्विक उर्फ सनी रामचंद्र जाधव असं त्याचं नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून गावठी बनावटीचे पिस्तूल आणि 4 जिवंत राऊंड जप्त केलंय. पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांच्या पथकाने बाचणी येथे ही कारवाई केली आहे.

Jalna News : मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ आज जालना जिल्हा बंदची हाक

मनोज जरांगे पाटील १७ सप्टेंबरपासून उपोषणाला सुरु आहे जरांगे यांची प्रकृती खालवत चालल्याने राज्यभरातील मराठा समाज आक्रमक झाला असून आज मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ जालना जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य करून त्यांचे उपोषण सोडावं अशी समाजाची मागणी आहे.या पार्श्वभूमीवर सकल मराठा समाजाकडून जालना बंदची हाक देण्यात आली आहे.जालना शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या सावरकर चौक आणि भाजी मार्केट मध्ये सध्या कडकडीत बंद असल्याचं पाहायला मिळात आहे.

Amravati News : अमरावती शहरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट; अनेकांना चावा, नागरिक भयभीत

अमरावती शहरात मोकाट कुत्र्यांचा संचार वाढल्याने नागरिक व लहान बालकांमध्ये चिंता वाढली आहे, शहरात गल्लोगल्लीत भटकी कुत्रे फिरतांना दिसत आहे, एप्रिल ते जुलै या महिन्यात 6 हजार 348 मोकाट कुत्र्यांनी चावा घेतला आहे, तर धक्कादायक म्हणजे दररोज 70 लोकांना भटकी कुत्रे चावा घेत आहे शहरात गल्लीत जिकडे तिकडं भटकी कुत्रे फिरतांना दिसत आहे. त्यामुळे घराबाहेर पडतांना भिती वाटत आहे. त्यामुळे अमरावती महानगरपालिकाने तात्काळ यावर उपाय योजना कराव्या ही मागणी केली जात आहे.

Parbhani News : सकल मराठा समाजाकडून परभणी जिल्हा बंदची हाक

मराठा समाजालाओबीसी संवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे सहाव्यांदा आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ सकल मराठा समाजाच्या वतीने आज परभणी जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. याबाबत सकल मराठा समाजाच्यादोन गटाकडून परभणी पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांना निवेदन देण्यात आले. या बंदमधून अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले असून सर्व व्यापारी बांधवांनी आपले व्यवसाय बंद ठेवून सहकार्य करावे, असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.

Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंच्या उपोषणाचा सहावा दिवस, मराठा समाज आक्रमक

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस असून दिवसेंदिवस त्यांची तब्बेत खालावत चालली आहे, त्यांच उपोषण तात्काळ संपाव या दृष्टीने सरकारने पावलं उचलावीत या मागणीसाठी पुण्यावरून सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत, आज त्यांच शिष्टमंडळ आणि मुख्यमंत्र्यांची भेट अपेक्षित आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.