Pune Rain Update : पुण्यातील काही भागात विजांचा कडकडाटसह मुसळधार पावसाला सुरूवात
esakal September 23, 2024 05:45 AM

राज्यात अनेक ठिकाणी येत्या काही दिवसात मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. यादरम्यान पुणे शहर आणि परिसरात रविवारी रात्री पावसाने जोरदार हजेरी लावली. शहरातील मध्यवर्ती भागांसह अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू आहे.

नऱ्हे, धायरी, नांदेड, किरकटवाडी, खडकवासला परिसरात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू असून या परिसरातील विद्युत पुरवठा बंद करण्यात आला आहे. यासोबतच घोरपडी परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे.

पुणे शहरात गेल्या अर्धा तासांपासून सर्वदूर पाऊस सुरू आहे. दरम्यान पुण्यासह राज्यात पुढील ५ ते ६ दिवस जोरदार पावसाची शक्यता हवमान विभागाने वर्तवली आहे. त्यानुसार विजांच्या कडकडाटासह पुढील ५ ते ६ दिवस पाऊस कायम राहणार आहे.

Nitin Gadkari :... अन्यथा 'हे' दोन रस्ते ताब्यात घेऊ; नितीन गडकरींनी राज्य सरकारला दिला तीन महिन्यांचा वेळ राज्यात कुठे पावसाचा इशारा?

दरम्यान राज्यात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मुंबई आणि उपनगरांमध्ये २४ ते २९ सप्टेंबर असे पाच दिवस मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. पूर्व विदर्भात देखील पाऊस आपली हजेरी लावेल. नागपूरमध्ये २४ सप्टेंबर रोजी मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यासोबतत राज्यातील काही भागात २४ सप्टेंबरपासून पुढचे चार दिवस पावसाच्या जोरदार सरी पाहायला मिळू शकतात, तसेच मराठवाडा, विदर्भात चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलीय.

Arvind Kejriwa : केजरीवालांनी मोहन भागवातांना विचारले 'हे' पाच अवघड प्रश्न; मोदींच्या निवृत्तीबद्दलही मागितला खुलासा

२३ सप्टेंबरला मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यानंतर २४ तारखेपासून राज्यात पावसाचा जोर वाढेल. २७ सप्टेंबरपर्यंत ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता आहे. काही भागात मुसळधार पावसाची शक्यता असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भाला येलो अलर्ट देण्यात आला आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.