Pune Crime : बदलापूरनंतर पुण्यात संतापजनक प्रकार; ४ वर्षीय चिमुकल्यावर तरुणाचा अनैसर्गिक अत्याचार
Saam TV September 23, 2024 05:45 AM

पुणे : बदलापुरात काही महिन्यांपूर्वी शाळेतील कर्मचाऱ्याने दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार केल्याच्या घटनेने महाराष्ट्र हादरला. या घटनेने राज्यभरात सर्वत्र पडसाद उमटले. या घटनेचा खटला फास्ट ट्रॅकवर सुरु आहे. या घटनेची सुनावणी कोर्टात सुरु असताना पुण्यातूनही असाच प्रकार समोर आला आहे. पुण्यातील राजगुरुनगरमध्ये एका ४ वर्षीय चिमुकल्यावर २४ वर्षीय तरुणाने अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राजगुरुनगरमधील या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्राला पुन्हा एकदा हादरवणारी घटना घडली आहे. पुण्यातील राजगुरुनगर शहरात वास्तव्यास असणारा चिमुकला घराजवळ खेळत असताना त्याला खाऊचे आमिष दाखवून घरात नेले. त्यानंतर २४ वर्षीय तरुणाने घरात चिमुकल्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार केले. या संतापजनक घटनेने राजगुरुनगरमध्ये खळबळ उडाली आहे.

या संतापजनक प्रकारानंतर राजगुरुनगर पोलीसांनी आरोपीविरोधात बाल लैगिंक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या लज्जास्पद प्रकारानंतर अमानुष अत्याचाराच्या घटनेने संताप व्यक्त केला जात आहे.

नागपुरात ८ वर्षीय मुलीवर अत्याचार

नागपुरातील पारडीत ८ वर्षीय मुलीवर घरात घुसून अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ८ वर्षीय मुलीवर ५६ वर्षीय व्यक्तीने अत्याचार संतापजनक प्रकार समोर आला आहे. पारडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली.

56 वर्षीय व्यक्तीचं छोटेसे दुकान चालवत असल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेनंतर पोलिसांना ओळख पटत नसल्यानं आरोपीचं स्केच तयार करून शोध घेण्यात आलं. त्यानंतर रात्री पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन कोर्टात हजर केलं. आरोपी घटनेच्या दिवशी घटनास्थळी पंडित शोधायला आला होता. त्यावेळी दोन मुलींना सुद्धा विचारणा केली. यावेळी घरात कुणी नसल्याचं पाहून त्याने पाच वर्षीय चिमुकलीला घराबाहेर ठेवून 8 वर्षीय मुलीला घरात नेऊन अत्याचार करून पसार झाला होता.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.