Alandi News : आळंदीत इंद्रायणी प्रदूषण मुक्तीसाठी चला एक पाऊल इंद्रायणीकडे अभियान
esakal September 23, 2024 03:45 AM

आळंदी : गणेश विसर्जन दिवशी अनेक गणेशभक्तांनी इंद्रायणीच्या गटारगंगेत मुर्ती विसर्जन केले. आधीच इंद्रायणी प्रदूषित होती.त्यात प्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या मुर्त्या पाण्यात सोडल्या. यामुळे पर्यावरणप्रेमी आणि नदीप्रदूषणावर जनजागृती करणार्या संस्थांनी एकत्र येत.

इंद्रायणी प्रदूषण मुक्तीसाठी चला एक पाऊल इंद्रायणीकडे अभियान आज रविवारी(ता.२२) राबवले. आणि मोशी येथे इंद्रायणी पात्राची स्वच्छता केली. आणि नदीपात्रातून शेकडो मुर्त्या बाहेर,विविध फोटो आणि कुजके कपडे बाहेर काढले.

ज्ञानेश्वर महाराज जम्मोत्सव सप्त शतकोत्तर सुवर्ण महोत्सव निमित्त पर्यावरणप्रेमींनी आणि अध्यात्मातील साधकांनी वर्षभर इंद्रायणीमाता आणि चंद्रभागा नदी प्रदूषण रोखणेकाणी स्वच्छता अभियान राबवावे असे आवाहन इंद्रायणी सेवा फाऊडेशनचे अध्यक्ष विठ्ठल शिंदे यांनी सांगितले.

दरम्यान आळंदीतील इंद्रायणी सेवा फाऊडेशन, पिंपरीतील ग्रीन आर्मी,इंद्रायणी जलमित्र अशा संघटनांनि एकत्र येत इंद्रायणी प्रदूषण मुक्तीसाठी चला एक पाऊल इंद्रायणीकडे अभियान राबवत नदीची स्वच्छता केली.यामधे विठ्ठल शिंदे, प्रशांत राऊळ, प्रकाश जुकंटवार, विजय सूर्यवंशी,विपुल कासार, विजय शेवाळे, संदीप शर्मा, हरीश कुलकर्णी, राजेश भट, हरी अय्यर,,जयसिंग भाट, गौतम कांबळे, श्रीकांत सावंत,सोमनाथ मोरे, विनायक लिमकर, संतोष मादर ,नितीन गायकवाड ,सचिन परुळेकर, रबिंद्रा झहा, राजेश पालवे, प्रकाश चक्रनारायण.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.