आदित्य, संजीत, रिद्धी, सानिका यांना अजिंक्यपद
esakal September 23, 2024 03:45 AM

पिंपरी, ता. २२ ः शालेय जिल्हास्तरीय नेमबाजी (रायफल शूटिंग) स्पर्धेमध्ये विविध प्रकारांत मुलांमध्ये आदित्य कदम, संजीत ढगे, सोहम चौगले, शंतनु लांडगे, ऋषिकेश कदम आदींनी तर मुलींमध्ये रिद्धी मुरकुटे,
सानिका आभाणे, कल्याणी तरस, श्रीजा कांबळे, आर्या म्हस्के आदींनी प्रथम क्रमांक पटकाविला.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, जिल्हा क्रीडा परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आणि अरुण पाडुळे स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या सहकार्याने, चिखली येथील कृष्णानगर मधील स्वामी विवेकानंद क्रीडा संकुलात वरील स्पर्धा झाली. स्पर्धेचे उद्घाटन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या क्रीडा अधिकारी अनिता अनिल केदारी यांच्या हस्ते झाले. फाउंडेशनचे अध्यक्ष अरुण पाडुळे, राज्य रायफल असोसिएशनचे पंच कमलेश सोनवणे, सौरभ साळवणे स्पर्धा प्रमुख व क्रीडा पर्यवेक्षक अनिल जगताप, बंडू आल्हाट आदी यावेळी उपस्थित होते. क्रीडा शिक्षक अशोक शिंदे यांनी सूत्रसंचालन केले.
स्पर्धेचे निकाल प्रथम, द्वितीय, तृतीय यानुसार पुढील प्रमाणे ः
ओपन साइट एअर रायफल ः१४ वर्षे मुले - श्लोक कुरकुटे (एसएनबीपी), समीर बेनिवाल (एसएनबीपी), विराज काकडे (अल्फान्सो); मुली - उत्कर्षा सराटे (ज्ञानप्रबोधिनी), आंचल जाधव (मास्टर माईंड ग्लोबल), समीक्षा पुलुगुरथा (एसएनबीपी); १७ वर्षे मुले - आदित्य कदम, आयुष बनकर (दोघेही एसएनबीपी), श्रीनिवास कुडीलकर (ॲकेडमी हाइट्स पब्लिक); मुली - रिद्धी मुरकुटे (एसएनबीपी), अनुक्षा जाधव (मास्टर माईंड), सई देशमुख (एसएनबीपी); १९ वर्षे मुले - संजीत ढगे, सारंग पाटील, सार्थक थोरात (तिघेही श्री शिवछत्रपती माध्यमिक); मुली - सारा जंगम (प्रतिभा इंटरनॅशनल), प्रणाली गुंजोटे (श्री शिवछत्रपती माध्यमिक), गौतमी तांगडे (थेरगाव माध्यमिक);
पीप साईट एअर रायफल ः १४ वर्षे मुले - सोहम चौगले (पोद्दार इंटरनॅशनल, चिंचवड), अधिराज जाधव (ज्ञानप्रबोधिनी), श्री दत्त काकडे (विद्या विनय निकेतन); आरोही रॉय (युरो), गोजिरी घाडगे, जोया शेख (दोघीही जयहिंद); १७ वर्षे मुले ः शंतनु लांडगे (ज्ञानप्रबोधिनी), आराध्य भागवत (इंदिरा नॅशनल), अश्विन देवळेकर (ज्ञानप्रबोधिनी); मुली - सानिका आभाणे (सिटी प्राईड), श्रावणी कुऱ्हाडे (एस.बी.पाटील), साई पांडे (केंब्रिज); १९ वर्षे मुले - राधेश परदेशी (डॉ. डी. वाय. पाटील), हर्ष राजपूत (जयहिंद), कौस्तुभ गोरे (ज्ञान प्रबोधिनी); मुली - श्रीजा कांबळे, आदिती चोपडे (दोघीही
एसएनबीपी); एअर पिस्टल ः १४ वर्षे मुले - त्रिशिर गुप्ते (निर्मल बेथनी), वीरेन गोफणे (बिकॉन), शार्दुल भाटे (सिटी प्राइड); मुली - कल्याणी तरस (सेंट जोसेफ बेथनी), साँची नेवाळे (अमृता), त्रिषा हजारनीस (सिटी प्राईड); १७ वर्षे मुले - ऋषिकेश कदम (आर्मी पब्लिक), प्रांशु सूर्यवंशी (एसएनबीपी), प्रथमेश कदम (आर्मी पब्लिक); मुली- आर्या म्हस्के (एस.बी.पाटील), रितिका आहेर (श्री शिवछत्रपती माध्यमिक), इशिता कुंभार (इंदिरा नॅशनल); १९ वर्षे मुले - आर्यन गोडनाडीकर (गायत्री इंग्लिश मीडियम), यशराज जवळकर (डॉ. डी. वाय. पाटील, चिंचवड), प्रणव सूर्यवंशी (एसएनबीपी); मुली - प्रमिला कांबळे (श्री फत्तेचंद जैन), राजनंदनी यादव.
PNE24U48458

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.