औद्योगिक वेटलिफ्टिंगमध्ये टाटा मोटर्सला विजेतेपद
esakal September 23, 2024 03:45 AM

पिंपरी, ता. २२ ः औद्योगिक क्रीडा संघटनेच्यावतीने, पिंपरी येथे आयोजित ६१ व्या वेटलिफ्टिंग स्पर्धेत टाटा मोटर्सने ३८ गुण मिळवून विजेतेपद पटकाविले. तर महेंद्र ॲण्ड महिंद्रला १३ गुणांसह उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. भावेश एंटरप्राईजेसच्या मनीष गजमल याने १९६.९९ किलो वजन उचलत सर्वोत्कृष्ट खेळाडूचा बहुमान प्राप्त केला.
टाटा मोटर्स कंपनीच्या ट्रेनिंग डिव्हिजन हॉलमध्ये वरील स्पर्धा झाली. स्पर्धेचे उद्घाटन टाटा मोटर्सचे डीजीएम (एचआर) अतुल अहिरे आणि टाटा मोटर्स युनियनचे अध्यक्ष शिशुपाल तोमर यांच्या हस्ते झाले. टाटा मोटर्सचे व्यवस्थापक (एचआर) प्रवीण तांबे, युनियन स्पोर्ट्स कमिटीचे अध्यक्ष शशिकांत कात्रे, युनियनचे प्रतिनिधी औदुंबर गणेशकर, विलास सपकाळ, विक्रम वर्पे, विनोद कुरंगळे, अबिद सय्यद, महेंद्र ॲण्ड महिंद्रचे व्यवस्थापक (एचआर) दत्ता गायकवाड, प्रवीण कांबळे (जेसीबी), संघटनेचे उपाध्यक्ष नरेंद्र कदम, स्पर्धा प्रमुख हरी देशपांडे आदी यावेळी उपस्थित होते. संघटनेचे खजिनदार प्रदीप वाघ यांनी प्रास्ताविक केले. आंतरराष्ट्रीय पंच प्रशांत बेंद्रे यांनी सर्व खेळाडूंना खेळाचे नियम समजावून सांगितले. किशोर मुसळे, प्रशांत बेंद्रे, नारायण औटी, उत्तम भोसले, नीलेश महाजन यांनी संयोजन केले. स्पर्धेचे पंच म्हणून राज्य वेटलिफ्टिंग संघटनेचे माजी सचिव प्रमोद चोलकर, पुणे जिल्हा सहखजिनदार अनंत साने यांनी काम पाहिले. स्पर्धेमध्ये टाटा मोटर्स, महिंद्र ॲण्ड महिंद्र, बजाज ऑटो (चाकण), मशिनिस्ट टेक्नॉलॉजी, एमक्यूअर, थरमॅक्स,भावेश एंटरप्राइजेस, डीएसडब्ल्यू व्हेईकल्स, सँडविक, एचइ एफ, त्रिगोन, मेवरिक, एसकेएफ या कंपन्यांच्या एकूण ३४ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. ही स्पर्धा एकूण दहा गटांमध्ये झाली.
स्पर्धेचे निकाल वजन गट व प्रथम, द्वितीय, तृतीय यानुसार पुढील प्रमाणे -
५५ किलो गट - सतीश बेदर ९५ किलो, देवेश वाघ (दोघेही टाटा मोटर्स) ७५ किलो; ६१ किलो गट - मनीष गजमल (भावेश एंटरप्राइजेस) १९५ किलो, शाकिब मुजावर १२५ किलो, संकेत पेरवी (दोघेही टाटा मोटर्स) १०७ किलो; ६७ किलो गट - मनोज थोरात (महेंद्र ॲण्ड महिंद्र) १११ किलो, विशाल तांदळे (एचइएफ) ११० किलो, सागर सदाकाळ (टाटा मोटर्स) ९५ किलो; ७३ किलो गट : अमोल मोर्डे १९२ किलो, किशोर मुसळे १२० किलो, सदानंद टेपुगडे १०५ किलो (तिघेही टाटा मोटर्स); ८१ किलो गट : नितीन जाधव (मशिनीस्ट टेक्नॉलॉजी) १४५ किलो, विक्रम खरात (टाटा मोटर्स) १३८ किलो, किशोर धोत्रे (महिंद्र ॲण्ड महिंद्र) १३७ किलो; ८९ किलो गट : स्वप्निल जवळकर (सँडविक एशिया) १६० किलो, दादासो चव्हाण १४६ किलो, शुभम मोहिते (दोघेही टाटा मोटर्स) १२५ किलो; ९६ किलो गट : विशाल साळगावकर (एमक्यूअर) १४५ किलो, अतुल ओव्हाळ (महिंद्र ॲण्ड महिंद्र) १३५ किलो, निखिल होगळे (महिंद्र ॲण्ड महिंद्र) १३० किलो; १०२ किलो गट : यशवंत कांबिरे (टाटा मोटर्स) १४५ किलो, राजेंद्र बुरकुले (महेंद्र ॲण्ड महेंद्र) ११० किलो; १०९ किलो गट ः अक्षय दरे (मॅवरिक) १२५ किलो, १०९ किलोवर : शेखर रावडे (टाटा मोटर्स) १०५ किलो.

PNE24U48487

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.