रमाई स्मारकासाठी बसलेल्या उपोषणकर्त्यांची आरोग्य तपासणी
esakal September 23, 2024 04:45 AM

पिंपरी, ता. २२ : रमाई आंबेडकर स्मारकाचे काम त्वरित सुरू करावे, या मागणीसाठी बौद्ध समाज बांधवांच्या वतीने उपोषण सुरू करण्यात आले आहे. महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर राजू गायकवाड, रामभाऊ ठोके यांच्या वतीने उपोषण सुरू आहे. उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे. उपोषण करणाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यावेळी पोलिस कर्मचारी देखील उपस्थित होते. रमाई स्मारकाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. पिंपरी चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या मागील बाजूस स्मारक निर्माण करण्याबाबत सामाजिक संघटना आंदोलन करीत आहेत. निवेदने देत आहेत. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होत आहे. रमाई स्मारकासाठी जागा आरक्षित आहे. मात्र स्मारकाचे काम सुरू नाही. याचा निषेध करण्यासाठी तसेच महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे उपोषण सुरू केले आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.