नवे प्रांत कार्यालय विकासाचे केंद्र बनले पाहिजे
esakal September 24, 2024 10:45 PM

- rat२४p१३.jpg-
P२४N१३६२३
राजापूर ः प्रांताधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजनप्रसंगी पालकमंत्री उदय सामंत, किरण सामंत, अॅड. हुस्नबानू खलिफे, शंकर बर्गे, डॉ. जास्मिन व अन्य.

प्रांत कार्यालय विकासाचे केंद्र बनावे

उदय सामंत ः वर्षभरात इमारतीचे काम पूर्ण करणार

सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २४ ः येथील प्रांताधिकारी कार्यालयाची इमारत उभी राहावी अशी मागणी पूर्ण होत आहे. पुढील वर्षभरात अद्ययावत व सुसज्ज प्रशासकीय इमारत उभी राहील. या कार्यालयाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या कामांची पूर्तता करताना ही इमारत विकासाचे केंद्र कसे बनेल या दृष्टीने अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कटिबद्ध असले पाहिजे, असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.
राजापूर तहसीलदार कार्यालयाच्या आवारात नवीन प्रांताधिकारी कार्यालय इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमावेळी ते बोलत होते. या वेळी माजी आमदार अॅड. हुस्नबानू खलिफे, सिंधुरत्न समितीचे सदस्य किरण सामंत, अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार, प्रांताधिकारी डॉ. जास्मिन, तहसीलदार विकास गंबरे, लांजा तहसीलदार प्रियंका ढोले, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अशफाक हाजू, दीपक नागले, जिल्हा बँक संचालक अमजद बोरकर, राजापूर अर्बन बँक संचालक हनिफ मुसा काझी, संजय ओगले, पोलिस निरीक्षक राजाराम चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी पालकमंत्री सामंत यांच्या हस्ते नामफलकाचे अनावरण करण्यात आले तर प्रांताधिकारी डॉ. जास्मिन यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून तर किरण सामंत यांच्या हस्ते कामाला सुरवात करण्यात आली. या वेळी सामंत म्हणाले, राज्यात पुन्हा एकदा महायुतीचेच सरकार येणार असल्याने या नवीन इमारतीचे उद्घाटनही आम्हीच करू. नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये कामासाठी येणारा प्रत्येक व्यक्ती समाधानाने परत गेला पाहिजे, असे काम करा.
या कार्यक्रमाला नायब तहसीलदार दीपाली पंडित, दीपक कुळ्ये, महसूल नायब तहसीलदार गुरव आदींसह सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. प्रास्ताविक प्रांताधिकारी डॉ. जास्मिन यांनी तर सुत्रसंचालन तलाठी गुरव यांनी केले. आभार तहसीलदार गंबरे यांनी मानले.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.