श्रीराम विद्यालयात कर्मवीरांची सवाद्य मिरवणूक
esakal September 24, 2024 10:45 PM

मंचर, ता. २४ : पिंपळगाव खडकी (ता. आंबेगाव) येथील श्रीराम विद्यालयात रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती उत्साहात साजरी झाली. यावेळी कर्मवीरांच्या प्रतिमेची सवाद्य मिरवणूक काढली होती.
स्कूल कमिटीचे ज्येष्ठ सदस्य तुकाराम बांगर, अशोक बांगर, शिवाजी पोखरकर, मथाजी पोखरकर, रमेश पोखरकर, मुख्याध्यापक बी.एस. कुतवल व नीलेश बाणखेले यांनी विद्यालयाच्या प्रांगणात असलेल्या कर्मवीरांच्या पुतळ्याचे पूजन केले त्यानंतर मिरवणुकीला सुरुवात झाली. मिरवणुकीच्या अग्रभागी पारंपारिक वेशभूषा केलेले विद्यार्थी, वारकरी दिंडी, टिपरी पथक, लेझीम व झांज पथक होते. गावकऱ्यांनी ठिकठिकाणी मिरवणुकीचे उस्फूर्तपणे स्वागत केले. यामध्ये कर्मवीरांच्या कार्याविषयी माहिती देणारे फलक लक्षवेधी ठरले. विद्यालयातील सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी या मिरवणुकीची व्यवस्था पहिली.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.