HC on False Promise of Marriage: लग्नाचे वचन देऊन बलात्कार, विवाहित महिला नाही करू शकत असा दावा; हायकोर्टाचे महत्वाचे निरीक्षण
esakal September 28, 2024 10:45 PM

मुंबई हायकोर्टाने लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याच्या प्रकरमात महत्वाचे विधान केले आहे. हायकोर्टाने म्हटले की लग्न झालेली महिला दुसऱ्या एखाद्या व्यक्तीवर आरोप करू शकत नाही की त्याने लग्नाचे खोटे आश्वासन देऊन तिच्यावर बलात्कार केला. जस्टिस मनीष पिताले यांच्या एकल खंडपीठाने बलात्कार प्रकरणात अटक झालेल्या पुण्याच्या एका तरुणाला जामीन मंजूर करताना हे विधान केले आहे.

कोर्टाने म्हटले की, जर महिला विवाहित असेल तर ती दावा करू शकत नाही की दुसऱ्या कुठल्यातरी पुरूषाने लग्नाचे खोटे आश्वासन देऊन तिच्यावर बलात्कार केला. तिला माहिती असायला हवे की लग्न होऊ शकत नाही. जर या प्रकरणात आरोपी देखील विवाहित असेल तरीही लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार केल्याची गोष्ट सिद्ध होऊ शकत नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, विशाल नागनाथ शिंदे नावाच्या एका व्यक्तीविरोधात बलात्काराचे प्रकरण नोंदवण्यात आले होते. तो स्वतः देखील विवाहित आहे. महिलेचे म्हणणे आहे की दोघांमध्ये पहिल्यांदा मैत्री झाली त्यानंतर नागनाथने लग्नाचे खोटे वचन देऊन तिच्यावर बलात्कार केला आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देखील दिली. तर यावर कोर्टाने म्हटले की, नागनाथकडे महिलेचा व्हिडीओ असल्याचा कुठलाही पुरावा आढळलेला नाही.

बन्ना शेख बनली रिया बर्डे...'त्या' बांगलादेशी पॉर्न स्टारबद्दल धक्कादायक खुलासा; राज कुंद्राशीही आहे कनेक्शन

तसेच शिंदेच्या वकिलांनी कोर्टात सांगितले की ते तपासात पूर्ण सहकार्य करत आहेत. कोर्टाने नवनाथ शिदे याला आदेश दिला आहे की त्याला पोलिसांनी बोलवल्यानंतर ताबडतोब पोलिस स्टेशनमध्ये हजर राहावे लागेल. यासोबतच तपासासाठी आपला मोबाईल फोन जमा करावा लागेल. कोर्टाने म्हटले की आतापर्यंत हे कळू शकलेले नाही की आरोपीने तसा एखादा व्हिडीओ सर्कुलेट केला आहे की नाही.

Maharashtra Rain Update : महाराष्ट्रात आज पुन्हा कोसळणार मुसळधार पाऊस! 'या' जिल्ह्यांना हवामान विभागाचा इशारा
© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.