Pune crime news yewalewadi glass company accident four workers killed urk
Marathi September 30, 2024 07:24 AM


पुणे – शहरातील येवलेवाडी येथील कारखान्यात मोठा अपघात झाला आहे. काचेच्या कारखान्यात हा अपघात होऊन चार जणांचा मृत्यू झाला.

कसा झाला अपघात

– Advertisement –

कारखान्यात गाडीतून काचा उतरवताना काचेच्या पेटीखाली सहा कामगार दाबले गेले. या अपघातात चौघांचा मृत्यू झाला आहे. एकावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. येवलेवाडीतील इंडिया ग्लास या काचेच्या कंपनीत ही दुर्घटना घडली आहे. मृत्यू झालेले चारही कामगार उत्तर प्रदेशातील आहेत. रोजगाराच्या निमित्ताने ते पुण्यात आलेले होते.

 

– Advertisement –

पुण्यातील येवलेवाडी येथे दुपारी एक ते दीडच्या सुमारास ही घटना घडली आहे. येवलेवाडी येथे असलेल्या काचेच्या कारखान्यात गाडीतून माल उतरताना काचेच्या पेटीखाली काही कामगार अडकले. या घटनेची माहिती कोंढवा अग्निशामक दलाला मिळाली होती. अग्निशामक दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी काचेच्या पेटीखाली दाबले गेलेल्या सर्व कामगारांना बाहेर काढले. त्यातील चार जणांची प्रकृती गंभीर होती. त्यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. काचेच्या पेटीखाली दाबले गेलेल्या सहा कामगारांपैकी चार जणांचा मृत्यू झाला आहे. एका कामगाराची प्रकृती गंभीर आहे.

पुणे अग्निशमन विभागातील अधिकारी समीर शेख यांनी या घटनेबद्दल माहिती दिली. ते म्हणाले की, रविवारी दुपारी येवलेवाडी भागातील कारखान्यात अपघात झाल्याची माहिती मिळाली. त्यावेळी काही लोक काचेच्या पेटीखाली दबले होते. त्या पेट्यांचे वजन खूप होते. एका पेटीचे वजन दोन ते अडीच टन होते. त्यातील चार जण पेटीखाली दाबले गेले होते.

चारही मृत उत्तर प्रदेशातील

येवलेवाडी कारखान्यात काम करणाऱ्या चार कामगारांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पवन रामचंद्र कुमार (वय 40), धमेंद्र सत्यपाल कुमार (वय 40), विकास प्रसाद गौतम (वय 23), अमित शिवशंकर कुमार (वय 27 ) या चौघांचा मृत्यू झाला आहे. हे सर्व कामगार उत्तर प्रदेशातील रहिवाशी होते. तसेच या अपघातात मोनेसर कोळी (वय 31) आणि जगतपाल संतराम कुमार (वय 41) हे गंभीर जखमी झाले.

येवलेवाडी येथील भागात अनेक कंपन्या आहे. त्यातील अनेक कंपन्या अनधिकृत आहे. त्यांच्याकडे परवाने नाही. तसेच शासनाच्या कोणत्याही नियमांचे पालन या ठिकाणी होत नाही. कंपनीत कामावर असलेल्या कर्मचारी आणि कामगारांच्या सुरक्षेबाबत कोणत्याही उपाययोजना केल्या नसल्याची चर्चा दबक्या आवाजात रविवारी घडलेल्या घटनेनंतर कामगारांमध्ये होती.

हेही वाचा :  Road Rage Accident : कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसाला चिरडले, 10 मीटरपर्यंत फरफटत नेले अन्…

Edited by – Unmesh Khandale



Source link

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.