बिग बॉस 18 साठी 'ही' अभिनेत्री ठरणार महागडी स्पर्धक, दिवसाला 5.4 लाख रुपयांची ऑफर
मुक्ता सरदेशमुख October 03, 2024 02:13 PM

Big Boss 18: हिंदी बिग बॉसच्या 18 व्या पर्वाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. सलमान खानचा पहिला प्रमवाल्यापासून या पर्वात कोणते स्पर्धक येणार आणि त्यांना किती मानधन मिळणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. नुकतेच बिग बॉसच्या नव्या पर्वात एका अभिनेत्रीची जोरदार चर्चा सुरू आहे ती तिच्या मानधनावरून. या अभिनेत्रीला दिवसाचे 5.4 लाख रुपये देण्यात येणार असल्याचं सांगितलं जातंय. बिग बॉसच्या पर्वातील सर्वाधिक मानधन असणाऱ्या स्पर्धकांपैकी ही अभिनेत्री असणार आहे. 

सध्या मराठी बिग बॉसच्या पाचव्या पर्वाचा महाअंतिम सोहळा आणि हिंदी बिग बॉसच्या अठराव्या पर्वाचा ग्रँड प्रीमियर एकाच दिवशी असणार आहे. 6 ऑक्टोबरला हिंदी बिग बॉसच्या नव्या परवाचा श्री गणेशा करण्यात येणार असून यंदाच्या पर्वातील सर्वात महागडी स्पर्धक ठरणार असल्याची चर्चा आहे. 

कोण आहे ही महागडी स्पर्धक? 

काही दिवसांपूर्वी बिग बॉस 18 च्या पर्वातील पहिल्या निश्चित स्पर्धकांच्या नावाचा खुलासा करण्यात आला होता. यात रोहित शेट्टीने काही नावांची घोषणा केली होती. याच नावांमध्ये असणारी स्पर्धक अभिनेत्री निया शर्मा हिच्या मानधनाची सोशल मीडियावर एकच चर्चा आहे. यंदाच्या पर्वातील ही सर्वात महागडी स्पर्धक ठरणार असल्याचं बिग बॉस ताजा खबर च्या instagram पेजवरही शेअर करण्यात आलंय. निया शर्माला जवळजवळ प्रत्येक सीझनमध्ये बिग बॉसची ऑफर आली आहे, परंतु अभिनेत्रीने नेहमीच ती ऑफर नाकारली आहे. ही पहिलीच वेळ आहे की अभिनेत्रीने या शोचा भाग होण्यास होकार दिला.

प्रत्येक एपिसोडसाठी मिळणार 5.4 लाख

इंस्टाग्राम पेजवर पोस्ट करण्यात आलेल्या माहितीनुसार मिया ही यंदाच्या पर्वातील सर्वाधिक मानधन घेणारी स्पर्धक आहे. निया शर्मानं 'नागिन' 'सुहागन, चुडेल ,एक हजारो मे मेरी बहना है अशा मालिकांमध्ये काम केलं आहे. टेलिव्हिजन वरील लोकप्रिय मालिकांमध्ये झळकलेली ही अभिनेत्रीच सर्वात महागडी स्पर्धक ठरणार असल्याचं बोललं जातंय. या अभिनेत्रीला प्रत्येक एपिसोड साठी 5.4 लाख रुपये दिले जाणार आहेत एवढेच नाही तर नियासोबत चौदा आठवड्यांचा करारही झाल्याचं सांगण्यात येतंय. 

यंदा बिग बॉस ची थीमही राहणार हटके

बिग बॉसच्या 18 व्या पर्वात यंदा 11 स्पर्धकांच्या नावांची चर्चा सुरू आहे. यंदा बिग बॉसच्या नव्या पर्वात बरीच वेगळी थीम राहणार आहे. भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळावर आधारित ही थीम असल्याने या शोमध्ये नक्की काय असणार याची प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे.

Bigg Boss 18 : मैत्रिणीसोबत लिपलॉक केल्याने अभिनेत्री ट्रोल, आता बिग बॉसच्या घरातील पहिला स्पर्धक ठरला; 'नागिण' निया शर्मा कुणाला डसणार?

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.