Two people who took a bribe of 10,000 for helping in the hearing work in the charity joint commissioner’s office were caught In Nashik
Marathi October 03, 2024 02:24 PM


नाशिक-पुणे रोडवरील धर्मादाय सहआयुक्त कार्यालयात सुनावणीच्या कामकाजात अडथळा न आणता मदत करण्यासाठी १५ हजारांची लाच घेताना दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी (दि. १) अटक केली. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Two people who took a bribe of 10,000 for helping in the hearing work in the charity joint commissioner’s office were caught in Nashik)

धर्मादाय सहआयुक्तालयातील न्याय लिपिक सुमंत सुरेश पुराणीक (४०, रा. श्री निधी बंगला, डीजीपीनगर-1, रेयॅान स्कुल जवळ, नाशिक पुणे रोड), लघुलेखक संदीप मधुकर बाविस्कर (४७, रायगड चौक, सिडको) अशी लाचखोरांची नावे आहेत.

– Advertisement –

तक्रारदारांकडे नवीन दाखल फाईलच्या नेमलेल्या तारखा देणे, सुनावणी कामकाजात अडवणुक न करणे, निकाली फाईल नकला विभागाला विहीत वेळेत पाठविणे, पुढील सुनावणीचे कामकाजात अडथळा न आणता कामकाज जलद गतीने करुन देण्याच्या मोबदल्यात लाचखोर पुराणीक याने २३ सप्टेंबर रोजी २० हजारांच्या लाचेची मागणी केली. तडजोडीअंती १५ हजार लाच देण्याचे ठरले. यासाठी लाच मागणीस लघुलेखक बावीस्कर याने प्रोत्साहन दिले होते. यापक्ररणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली असता, शहानिशा करण्यात आली. त्यानुसार मंगळवारी (दि. १) द्वारका येथील धर्मादाय सहआयुक्त कार्यालयात सापळा रचण्यात आला. साक्षीदारांच्या समक्ष लाचखोरांनी लाचेची रक्कम स्वीकारली असता, त्यांना पकडले. ही कामगिरी अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी, पोलीस निरीक्षक स्वप्निल राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन पाटील, पोलीस नाईक विनोद चैधरी, अनिल गांगोडे यांनी बजावली.



Source link

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.