Goa News: डिचोलीत सलग दुसऱ्या दिवशी पावसाचं धूमशान; वाचा दिवसभरातील घडामोडी
dainikgomantak October 09, 2024 09:45 AM
डिचोलीत सलग दुसऱ्या दिवशी पावसाचं धूमशान!

सलग दुसऱ्या दिवशी परतीच्या पावसाचा तडाखा. विजांचा लखलखाट आणि गडगडाटासह मंगळवारी (ता. 8) सायंकाळी डिचोलीत बहुतेक भागात जोरदार पर्जन्यवृष्टी. वीज प्रवाह खंडित. जनजीवन विस्कळीत.

'...सावंत सरकार बरखास्त करा', काँग्रेसचा हल्लाबोल

मागील आठवड्यात निर्माण झालेली धार्मिक तेढ आटोक्यात आणण्यासाठी सरकार अपयशी ठरले. त्यामुळे सावंत सरकार बरखास्त करण्याची गोवा काँग्रेसची राज्यपालांना विनंती. तसेच, निवृत्त उच्च न्यायालय न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करुन झालेल्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी.

कदंब बसस्थानकाचे काम करणाऱ्या कामगारांकडून निष्काळजीपणा

डिचोलीतील कदंब बसस्थानकाचे काम करणाऱ्या कामगारांकडून निष्काळजीपणा. सुरक्षेच्यादृष्टीने काळजी न घेता साधारण तीस मीटर उंचावर 'रुफ' उभारण्याचे काम सुरु.

न्याय मिळेल, कृपया शांतता राखा! आमदार क्रुझ सिल्वा यांचे आवाहन

"सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे फेस्त जवळ येत आहे. सर्व धर्मांनी एकत्र येऊन हा उत्सव शांततेत साजरा करूया. गोवावासी शांततेत सोबत उभे आहेत हे जगाला दाखवूया". आमदार क्रुझ सिल्वा यांचे आवाहन.

वेलिंगकरांच्या प्रकरणात पोलिस वेळकाढूपणा करतायेत, अमित पालेकरांचा घणाघात

सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याबाबत वेलिंगकरांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरुन राज्यात राळ उठली आहे. विरोधक सत्ताधारी सावंत सरकारवर ताशेरे ओढत आहेत. यातच, गोव्यातील आम आदमी पक्षाचे नेते अमित पालेकर यांनीही चांगलाचं समाचार घेतला. गोवा पोलिसांची एक खासियत आहे, ती म्हणजे पॉलिटिकल केस असेल तर ते लवकरात लवकर कामाला लागतात. मात्र तसे नसेल तर ते कारणे देऊन वेळकाढूपणा करतात. गोवा पोलिस हे वेलिंगकरांच्या बाबतीत मुद्दाम वेळकाढूपणा करतायेत. या सगळ्यात सरकारचाही तितकाच सहभाग आहे. वेलिंगकराच्या स्टेटमेंटमध्ये सुद्धा सरकारचा हात असणार, असा घणाघात पालेकरांनी केला.

बोरी पूल 13 ऑक्टोबर रोजी बंद!

तपासणीच्या कारणास्तव बोरी पूल 13 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 ते 8 दरम्यान वाहतुकीसाठी बंद राहणार.

शाळांमध्ये रोमन लिपीत कोकणी भाषा सुरु करण्याचा ठराव मांडा; ग्लोबल फोरमची आमदार डिसोझा यांना विनंती

आगामी विधानसभा हिवाळी अधिवेशनात गोव्यातील शाळांमध्ये रोमन लिपीत कोकणी भाषा सुरु ठराव मांडण्याची विनंती ग्लोबल कोकणी फोरमने म्हापशाचे आमदार जोशुआ डिसोझा यांच्याकडे केली. इयत्ता 1 ते 10 पर्यंत टप्याटप्याने कोकणीचा परिचय, रोमन लिपी वापरणाऱ्या कॅथलिक समुदायाला पाठिंबा देणे आणि कोकणीचे अस्तित्व सुनिश्चित करणे हा उद्देश आहे. हे पाऊल अल्पसंख्याक भाषांसाठी संवैधानिक संरक्षण आणि नवीन शैक्षणिक धोरण (NEP) यांच्याशी संरेखित आहे.

गोव्याला परतीच्या पावसाचा दणका, दोन दिवस यलो अलर्ट; सत्तरी, डिचोलीत हाहाकार!

IMD ने गोव्यात 8 आणि 9 ऑक्टोबरसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा राज्यभर असण्याची दाट शक्यता आहे.

शिरवाईत पाण्याची पाईपलाईन फुटली

शिरवाई केपे येथे काल सकाळी पाण्याची पाइपलाइन फुटली. आजतागायत कोणतीही दुरुस्ती करण्यात आलेली नाही.

बगलमार्गाला अस्वच्छतेचे ग्रहण

बगलमार्गाला अस्वच्छतेचे ग्रहण. डिचोलीतील नवीन चौपदरी बगलमार्गाच्या बाजूने कचरा टाकण्याचे प्रकार. बगलमार्ग 'नितळ' ठेवण्याच्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या आवाहनाला हरताळ.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.