Ratan Tata Successor : रतन टाटांनंतर कोण सांभाळणार एवढं मोठं साम्राज्य...? तीन नावं आहेत आघाडीवर
Mensxp October 10, 2024 08:45 PM


Ratan Tata Successor : भारतातील सर्वात सन्मानित उद्योगपती टाटा सन्सचे मानद चेअरमन रतन टाटा यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले. ते काही दिवसांपासून मुंबईच्या ब्रिज कँडी रूग्णालयात उपचार घेत होते. ते रूग्णालयात रूटीन चेकअपसाठी गेले होते. मात्र बुधवारी रात्री त्यांच्या निधनाची बातमी आली. टाटा ग्रुपने रतन टाटा यांचे निधन झाल्याची माहिती एक्सवरून दिली. आरपीजी ग्रुपचे प्रमुख हर्ष गोयंका यांनी ट्विट केलं होतं.   

दरम्यान, आता रतन टाटा यांच्या निधनानंतर जगभरात विखुरलेल्या टाटा ग्रुपची सूत्रे कोणाच्या हातात जाणार याची चर्चा सुरू झाली आहे. टाटा कुटुंबातीलच काही तरूण व्यक्ती या रतन टाटा यांच्या उत्तराधिकारी असू शकतात. याच लेह, माया, नेविल यांची नावे आघाडीवर आहेत. हे सर्वजन टाटा ग्रुपमध्येच राहून आपली प्रतिभा हळूहळू सिद्ध करून दाखवत आहेत . 

हेही वाचा : Ratan Tata : रतन टाटांचे १० कोट जे तुमचं आयुष्य बदलून टाकतील

लेह टाटा 


  लेह टाटा हे नोएल नवल टाटा यांचे ज्येष्ठ सुपूत्र आहेत. नोएल हे रतन टाटा यांचे सावत्र भाऊ आहेत. लेह टाटा यांनी स्पेनमधील माद्रिद येथील आयई बिजनेस स्कूलमधून मार्केटिंगमधील मास्टर डिग्री घेतली आहे. त्यांनी २००६ मध्ये टाटा ग्रुप जाईन केला होता. त्यांनी ताज हॉटेल्स रिसॉर्ट अँड पॅलेस या कंपनीत असिस्टंट सेल्स मॅनेजर म्हणून आपली कारकीर्द सुरू केली होती. आता ते द इंडियन हॉटेल कंपनी (IHCL) मध्ये व्हाईस प्रेसिडेंट आहेत.   


माया टाटा 

नोएल टाटा यांची सर्वात लहान मुलगी माया टाटा यांनी टाटा कॅपिटलपासून आपली कारकीर्द सुरू केली आहे. त्यांनी अॅनलिस्ट म्हणून या ग्रुपमधून सुरूवात केली. तर त्यांचे भाऊ नेविल टाटा यांनी त्यांची व्यावसायिक सुरूवात ही ट्रेंट या रियालिटी चेनमधून केली. त्यांनी आपल्या वडिलांना व्यवसाय उभारणीत मदत केली. 

  हेही वाचा : Ratan Tata : भारताचा मानबिंदू हरपला... प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे निधन  

रतन टाटा यांनी १९९१ मध्ये टाटा ग्रुपची सूत्रे आपल्या हातात घेतली होती. त्यानंतर त्यांनी टाटा टेलिसर्विस (१९९६), टीसीएस (२००४) या दोन मोठ्या कंपन्यांची सुरूवात केली. त्यांनी २०१२ मध्ये टाटा सन्सच्या चेअरमन पदाचा राजीनामा दिला होता. त्यांनी टाटा सन्स, टाटा इंडस्ट्रिज, टाटा मोटर्स, टाटा स्टील, आणि टाटा केमिकल या कंपन्यांमध्ये मानद चेअरमनपद स्विकारलं होतं. 

रतन टाटा ट्रस्टचे देखील काम पाहत होते. रतन टाटा यांना त्यांच्या उद्योग जगतातील भरीव कामगिरीसाठी २००० मध्ये पद्म भूषण आणि २००८ मध्ये पद्म विभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. हे भारताचे सर्वात मोठे दोन नागरी पुरस्कार आहेत. 

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.