Former BJP minister Laxman Dhoble will join Sharad Pawar NCP rrp
Marathi October 19, 2024 09:24 AM


अजित पवारांच्या त्रासाला कंटाळून मी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपामध्ये आलो होतो. पण आता ते (अजित पवार) भाजपासोबत आले आहेत आणि पुन्हा मला त्रास देत आहेत. अजित पवारांच्या या त्रासाला कंटाळून मी आता भाजपा सोडत आहे, अशी घोषणा भाजपाचे माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी केली.

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीकडून जागावाटपाबाबत अंतिम टप्प्यात चर्चा आली आहे. अशावेळी दोन्ही गटातील विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेले उमेदवार दुसरा पर्याय शोधताना दिसत आहे. महायुतीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला कमी जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवार शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करताना दिसत आहेत. अशातच भाजपामधून उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या माजी मंत्र्याने तुतारी हाती घेण्याची घोषणा केली आहे. (Former BJP minister Laxman Dhoble will join Sharad Pawar NCP)

विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर 22 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज भरायचा आहे. त्यामुळे उमेदवारीसाठी इच्छुक नेते पक्ष बदलताना दिसत आहेत. भाजपाचे माजी मंत्री आणि मोहोळ मतदारसंघातून उमेदवारीसाठी इच्छुक असलेले लक्ष्मण ढोबळे यांना पक्षात मागील 10 वर्षांपासून डावललं जात आहे. त्यामुळे लक्ष्मण ढोबळे यांनी भाजपाला सोडचिठ्ठी द्यावी, अशी मागणी त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी केली होती. त्यामुळे लक्ष्मण ढोबळे लवकरच भाजपामधून बाहेर पडतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती.

– Advertisement –

हेही वाचा – Mahavikas Aghadi : मते कमी करण्यासाठी…, मविआचा महायुतीवर थेट आरोप

लक्ष्मण ढोबळे गुरुवारी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांची भेट घेतली होती. यानंतर आता त्यांनी स्वत:च भाजपाला सोडचिठ्ठी देऊन शरद पवार गटात प्रवेश करण्याची माहिती दिली आहे. त्यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले की, अजित पवारांच्या त्रासाला कंटाळून मी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपामध्ये आलो होतो. पण आता ते (अजित पवार) भाजपासोबत आले आहेत आणि पुन्हा मला त्रास देत आहेत. अजित पवारांच्या या त्रासाला कंटाळून मी आता भाजपा सोडत आहे, अशी घोषणा त्यांनी केली.

– Advertisement –

लक्ष्मण ढोबळेंचा अजित पवारांना सल्ला

अजित पवारांना सल्ला देताना लक्ष्मण ढोबळे म्हणाले की, अजित पवारांना वाटतं की, पैशांचा जिवावर राजकारण करता येतं, मात्र तसं होत नाही. त्यांच्या काकांनी कसं राजकारण केलं ते त्यांना पाहावे. पण माझं आता ठरलं आहे. मी दोन दिवसांत आपला राजीनामा भाजपाला पाठवून देणार आहे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे. मोहोळ मतदारसंघातून उमेदवारी मिळाली नाही तरी चालेल, मात्र आता शरद पवार गटात प्रवेश निश्चित आहे, अशी माहिती लक्ष्मण ढोबळे यांनी दिली.

हेही वाचा – Sanjay Raut : पोपटपंची करणाऱ्या भाजपा नेत्यांनी गप्प बसावे, अन्यथा…; राऊतांचा इशारा


Edited By Rohit Patil



Source link

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.