'आज सर्व पक्षांतील साहेबांच्या कृपेकरुन...', ठाण्यातील घोडबंदर रोडवरील समस्यांवर मराठी अभिनेत्याची संतप्त पोस्ट
जयदीप मेढे October 21, 2024 07:43 PM

Abhijeet Kelkar on ghodbunder Road : ठाण्यातील घोडबंदर ( ghodbunder Road) परिसर हा तसा गजबलेला परिसर म्हणून ओळखला जातो. या रस्त्यावरील ट्रफीकची समस्या ही अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे या परिसरात राहणाऱ्या लोकांनाही बऱ्याचदा या समस्यांचा सामना करावा लागत असल्याचं पाहायला मिळतंय. यावर नुकतच अभिनेता अभिजीत केळकर (Abhijeet Kelkar) याने एक पोस्ट केली आहे. अभिजीतची ही पोस्ट सध्या बरीच चर्चेत आलीये. 

राज्यात विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं आणि प्रत्येक पक्षाने अगदी कंबर कसून तयारी सुरु केलीये. नव्या योजनांच्या घोषणा, बरीच उद्घाटनं निवडणुकीची आचारसंहिता लागण्याआधी पूर्ण झालीत. पण प्रत्येक वेळी उभा असणारा मुंबईच्या रस्त्यांचा प्रश्न हा यंदाच्या निवडणुकीच महत्त्वाचा मुद्दा ठरणार का? याकडे लक्ष आहेच. यावर सामान्य माणसं त्याचप्रमाणे कलाकारही व्यक्त होताना, संतापताना पाहायला मिळतात.

अभिजीतची पोस्ट नेमकी काय? 

अभिजीतने त्याच्या सोशल मीडियावर एक पोस्टचा फोटो शेअर केलाय. त्या पोस्टमध्ये अभिजीतने म्हटलं की, 'आज सर्व पक्षांतील साहेबांच्या कृपेकरुन घोडबंदर रोडवरील घाटातील चांद्रभूमीवर, सर्व पक्षांतर्फे सामुहिक करवा चौथचे आयोजन करण्यात आले आहे. तरी नागरिकांना ह्या मोफत सेवेचा अवश्य लाभ घ्यावा... निमंत्रक आणि शुभेच्छुक सर्वच पक्षांतील साहेब...'

अभिजीतने याच पोस्टवर कॅप्शन लिहित म्हटलं की, 'ठाण्यातील एक अतिशय महत्त्वाचा आणि बारा महिने, चोवीस तास रहदारीचा असलेला घोडबंदर रोड. गेली अनेक वर्ष, त्यावरील अत्यंत निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांच्या कामामुळे चर्चेत असतो...दोन्ही बाजूच्या गाड्या, heavy ट्रक्स, ट्रॉलर्स रोज येऊन घाटात अडतातच, त्यात इथे स्ट्रीट लाइट्सही नाहीत त्यामुळे अनेकदा अपघातही होतात, त्यामुळे वाहनं अडतात ते वेगळंच... रोज अक्षरशः जीव मुठीत घेऊनच इथून प्रवास करावा लागतो... मी ही काही वर्षांपूर्वी याच ठिकाणी, बाईक accident मधे, मरता मरता वाचलो होतो पण अजूनही परिस्थिती बदललेली नाही... निवडणुका आल्या-गेल्या, येतील-जातील, तसेच जीवही गेले, जातील आणि अंतरालातला हा प्रवास असाच अव्याहत सुरू राहील.' 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Abhi Kelkar (@abhijeetkelkar21)

ही बातमी वाचा : 

Marathi Actors : 'ते अचानक निघून जातात अन् केवळ त्यांचे नंबर राहतात...', दिग्गजांच्या एक्झिटवर मराठी दिग्दर्शकाचे भावनिक शब्द

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.