मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उप मुख्यमंत्री अजित दादा पवार उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोठ्या घोषणा करतील अशी शक्यता आहे. महयुतीचा दहा सूत्री कार्यक्रम जाहीर करण्यात येणार आहे. लाडक्या बहिणींना खुशखबर मिळण्याची शक्यता आहे. महिला, शेतकरी, युवकांबाबत महायुतीचा मोठा प्लॅन आहे.
यवतमाळमध्ये राज ठाकरेंच्या सभेला सुरुवातराज ठाकरेंच्या सभेला सुरुवात झालीय. यवतमाळमधील उमेदवारासाठी राज ठाकरे प्रचार सभा घेत आहेत.
भाजपचे नाराज उमेदवार मोहन सूर्यवंशी यांनी फोडला प्रचाराचा नारळसाक्री मतदारसंघामध्ये महायुतीतील भाजपचे नाराज उमेदवार मोहन सूर्यवंशी यांनी बंडखोरी केल्यामुळे महायुतीच्या शिंदे गट शिवसेनेच्या उमेदवार मंजुळा गावित यांच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे, भाजपचे नाराज उमेदवार मोहन सूर्यवंशी यांनी आपला दाखल केलेला अपक्ष उमेदवारी अर्ज माघारी न घेता आज त्यांच्या प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. मोहन सूर्यवंशी यांनी आज आपल्या प्रचाराचा नारळ फोडत साक्री शहरातून जोरदार प्रचाराला सुरुवात केली असून, महायुतीच्या शिंदे गट शिवसेनेच्या उमेदवार मंजुळा गावित यांना हे आवाहन मानले जात आहे.
शिवसेना शिंदे गटाचे नेते आमदार राजू पारवे यांचा भाजपमध्ये प्रवेशशिवसेना शिंदे गटाचे नेते व माजी आमदार राजू पारवे यांनी आज शिवसेना ( शिंदे गट) सोडत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
थोड्या वेळापूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या घरी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला आहे.
उमरेड मतदारसंघ भाजपला सुटल्यानंतर राजू पारवे यांनी सुरुवातीला बंडखोरीचा पवित्रा घेतला होता.
मात्र देवेंद्र फडणवीस यांनी शिष्टाई केल्यानंतर त्यांच्या शब्दावर कालच राजू पारवे यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेत भाजपला उमरेड मतदार संघात दिलासा दिला होता.
बेलापूर मधून संदीप नाईक यांनी फोडला प्रचाराचा नारळबेलापूर मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप नाईक यांनी आज प्रचाराचा नारळ फोडत प्रचाराला सुरुवात केलेय. विद्यमान आमदारांची मतदार संघातील अनुपस्थिती आणि नागरिकांना मिळणारी अपमानास्पद वागणूक या विरोधात जनतेने ही निवडणूक हातात घेतली असून बेलापूर मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी बेलापूर मतदारसंघातील जनता महाविकास आघाडीला मतदान करतील असा विश्वास यावेळी संदीप नाईक यांनी व्यक्त केलाय.
बारामतीत भाजपला मोठा धक्का; बड्या नेत्याचा शरद पवार गटात प्रवेशशरद पवारांच्या उपस्थितीत बारामतीतील भाजपचे नेते हनुमंत कोकरे यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश होतोय.
वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा जाहीर कोल्हापुरात महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक ; उद्धव ठाकरेंनी दिला कानमंत्रउद्धव ठाकरे हे आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी ठाकरे यांनी कोल्हापुरातल्या उजळाईवाडी येथे महाविकास आघाडीचे उमेदवार आणि प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी कोल्हापुरातील महाविकास आघाडीचे दहाही उमेदवार उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना कानमंत्र देत काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांचं कौतुक करत महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना निवडून आणण्याची जबाबदारी त्यांच्यावर दिलीय. तसेच मतदानासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत त्यामुळे कार्यकर्त्यांनी एक दिलाने कामाला लागावं असं उद्धव ठाकरेंनी म्हटले.
शेअर बाजारात पुन्हा बहार, सेन्सेक्स ६९४ अंकांनी वधारला मिलिंद देवरा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रारठाकरे गटाचे नेते आणि खासदार अनिल देसाई यांच्याकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार
वरळीतील शिंदे गटाचे उमेदवार मिलिंद देवरा यांच्या विरोधात अनिल देसाई यांच्याकडून तक्रार करण्यात आलीय. वरळी येथील शोभायात्रेत पाचशे रुपये देऊन आम्ही या यात्रेत सहभागी झाला असल्याचं लोकांनी कबूल केला आहे. त्यासंदर्भात निवडणूक आयोगाने कारवाई करावी, अशी तक्रार अनिल देसाई यांनी दिली आहे. आचारसंहितेचा भंग मिलिंद देवरा यांनी केला असून यांच्यावरती कडक कारवाई करावी अनिल देसाई यांची मागणी
संसदेचे हिवाळी अधिवेशन २५ नोव्हेंबरपासून२५ नोव्हेंबर ते २० डिसेंबरपर्यंत हिवाळी अधिवेशन चालणार आहे. केंद्रीय सांसदीय कार्यमंत्री किरेन रिजीजू यांनी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून माहिती दिलीय.
पोर्श कार अपघात प्रकरण; अरुण कुमार सिंग यांचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयाने फेटाळलारक्त नमुने फेरफार प्रकरणात आरोपी अरुण कुमार सिंग यांच्या मुलाचेही रक्त नमुने बदलले होते. आरोपी अरुण कुमार सिंग यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला आहे. त्याला पुणे शहर पोलिसांसमोर आत्मसमर्पण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
काँग्रेस मधून बंड केलेल्या अपक्ष उमेदवार आबा बागुल यांना मिळालं चिन्हकाँग्रेस मधून बंड केलेल्या अपक्ष उमेदवार आबा बागुल यांना मिळालं चिन्ह
आबा बागुल यांना "हिरा" हे चिन्ह देण्यात आलं आहे आहे
बागुल हे पर्वती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार
काँग्रेस मधून उमेदवारी न मिळाल्यामुळे आबा बागुल अपक्ष निवडणूक लढवणार
पुण्यातील पर्वती मध्ये तिरंगी लढत होणार
विद्यमान आमदार माधुरी मिसाळ यांच्या विरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादी च्या अश्विनी कदम तर अपक्ष आबा बागुल रिंगणात
सांगोल्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा दीपक साळुंखे यांना पाठिंबासांगोल्यात मोठी राजकीय घडामोडी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने ठाकरे गटाचे उमेदवार दीपक साळुंखे यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे शेतकरी कामगार पक्षाच्या अडचणी वाढल्या आहेत.
आज दिपक साळुंखे यांचा प्रचाराचा शुभारंभ झाला.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष जयमाला गायकवाड यांनी पाठिंबा जाहीर केला आहे.
Satara News : साताऱ्यातील शेंद्रे येथे 1 कोटी रुपयांची रोकड जप्तपुणे बंगलोर महामार्गावर सातारा तालुका पोलिसांची मोठी कारवाई...
पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांनी केली कारवाई ...
क्रेटा गाडीत सापडली रोकड...
पोलिसांना मिळालेल्या माहिती नंतर गाडीचा तपासणीत सापडली मोठी रक्कम...
रोकड नेमकी कोणाची याचा तपास सुरू...
उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखलउद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलं उद्धव ठाकरे यांचे स्वागत
सतेज पाटील, सत्यजित सरूडकर, राहुल पाटील, संजय पवार यांच्यासह अन्य नेत्यांनी केलं उद्धव ठाकरे यांचे स्वागत
Maharashtra Marathi News Live Updates : भाजपचे बंडखोर उमेदवार विशाल परब यांची हकालपट्टीसावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून विशाल परब यांनी केलीय बंडखोरी. वरिष्ठांनी समज देऊन देखील विशाल परब यांनी उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केली हकालपट्टी निवडणूक काळात विशाल परब यांना मदत करणाऱ्या भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर देखील दिले कारवाईचे संकेत.
Maharashtra Marathi News Live Updates : कालच्या विषयावर पडदा टाकत आहे. पुढील दिशा संध्याकाळपर्यंत स्पष्ट होईल - सतेज पाटील Maharashtra Marathi News : अब्दुल सत्तार यांच्या प्रचाराला भाजपचा नकारसिल्लोड विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचे उमेदवार अब्दुल सत्तार यांच्या प्रचारावर स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपचे शहराध्यक्ष कमलेश कटारिया यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आम्ही बहिष्कार टाकणार टाकला आहे असे सांगितले आहे.
Pune Crime : विमानामध्ये बॉम्ब असल्याच्या अफवा पसरवल्याच्या घटनांमध्ये वाढइंडिगो एअरलाइन्स कंपनीच्या विमानात बॉम्ब ठेवल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल
अफवा पसरविल्याप्रकरणी विमानतळ पोलिसांकडून सोशल मीडियातील खातेधारकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी अॅडमलान्झा ९७५१४ या नावाने सोशल मीडियावर खाते वापरणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुरबाडमध्ये तिघांची माघार, तर ९ उमेदवार रिंगणातमुरबाड मतदारसंघात अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ३ उमेदवारांनी माघार घेतली असून आता ९ उमेदवार रिंगणात आहेत. यापैकी भाजपाचे किसन कथोरे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सुभाष पवार यांच्यात प्रमुख लढत होणार आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ६ दिवसांत २१ सभांचा धडाकामुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चार सभा महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी घेणार
आज नागपूरमधील रॅली नंतर कोल्हापूर मध्ये महायुतीच्या सभेला लावणार हजेरी
पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ या ठिकाणी पहिल्या टप्प्यात सभा
महायुतीचे सरकार आणण्यासाठी फडणवीसांकडून मोठ्या संख्येने सभांचे नियोजन
उमेदवारी मागे घेणाऱ्या बंडखोराला शिंदेंचं गिफ्टपालघर - शिवसेना शिंदे गटातून बोईसर विधानसभेसाठी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून माघारी घेणाऱ्या जगदीश धोडी यांना एकनाथ शिंदेंकडून गिफ्ट . उमेदवारी अर्ज माघारी घेताच अवघ्या काही तासात जगदीश धोडी यांची शिवसेना शिंदे गटाच्या उपनेतेपदी निवड . तर त्यांचे सहकारी वैभव संखे यांची पालघर सहसंपर्क प्रमुख पदी निवड . अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून जगदीश धोडी तीन दिवसांपासून होते नोट रिचेबल . मात्र मुख्यमंत्र्यांच्या भेटी नंतर धोडी यांनी आपला उमेदवारी अर्ज घेतला होता मागे . मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी दोघांनाही काल रात्रीच्या सुमारास दिलं नियुक्त पत्र .
Maharashtra Marathi News Live Updates : युगेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी शरद पवार मैदानातबारामती विधानसभा मतदारसंघांमध्ये पवार विरुद्ध पवार असे लढत होत असल्याने या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे युगेंद्र पवार विरुद्ध अजित पवार अशी लढत होत आहे. युगेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी स्वतः शरद पवार मैदानात उतरले असून आज शरद पवार शिरसुफळ सुपा मोरगाव आणि सोमेश्वर या ठिकाणी जाहीर सभा घेणार आहेत. संध्याकाळी बारामतीत व्यापारी मेळावा, डॉक्टर मेळावा आणि वकील मेळावा शरद पवार घेणार आहेत.
Pune News : पुण्यात ९ ठिकाणी बंडखोरी कायमविधानसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यातील २१ मतदारसंघांपैकी ९ ठिकाणी बंडखोरी कायम राहिली आहे.
महाविकास आघाडी आणि महायुतीला काही ठिकाणी बंडखोरांची मनधरणी करण्यात यश आले तर काही ठिकाणी अपयश...
मावळ,भोर, इंदापूर, पुरंदर, जुन्नर, चिंचवड आणि पुण्यातील पर्वती, कसबा आणि शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघांत बंडखोरी झाली आहे.
यात पुण्यातील चार मतदारसंघांत महाविकास आघाडीचे बंडखोर उमेदवार
तर मावळ, भोर, पुरंदर, जुन्नर आणि चिंचवडमध्ये महायुतीच्या पाच उमेदवारांनी बंडाचा झेंडा कायम ठेवला आहे...
बंडखोरांमुळे निवडणुकीमध्ये चुरस निर्माण होणार आहे
Maharashtra News Live Updates : पुण्यातील काँग्रेसच्या बंडखोर नेत्यांना प्रस्ताव दिला जाणारपुण्यातील काँग्रेसच्या बंडखोर नेत्यांना प्रस्ताव दिला जाणार आहे. अर्ज माघारीची मुदत संपुनही अर्ज कायम ठेवले तरी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर करा अन्यथा पक्षात हकालपट्टीची कारवाई केली जाणार आहे.
काँग्रेसकडून दोन दिवस वाट बघितली जाणार,अन्यथा कारवाईला सामोर जावं लागणार
पर्वतीत आबा बागुल यांची बंडखोरी , शिवाजीनगरला मनीष आनंद तर कसब्यात कमल व्यवहारे यांनी बंडखोरी करत आपले अर्ज कायम ठेवले आहे.त्यामुळे आता काँग्रेसकडून या नेत्यांना प्रस्ताव देण्यात येणार आहे.
पाठिंबा द्या अन्यथा कारवाई केली जाणार
पुण्यात दोन काँगेसच्या विधानसभा मतदासंघात तर एका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांच्या मतदारसंघात काँग्रेस बंडखोर रिंगणात आहेत.