महाविकास आघाडीचा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला आहे. यामध्ये महिला, शेतकरी, युवक शिक्षण, आरोग्य, उद्योग, व्यवसाय, सामाजिक न्याय या महत्त्वाच्या विषयांवर लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे. तर महालक्ष्मी योजने अंतर्गत महिलांना महिना 3000 देण्यासह महिलांना बस प्रवास मोफत करण्याच आश्वासन देण्यात आलं आहे.
Manifesto Of Mahavikas Aghadi : थोड्याच वेळात महाविकास आघाडीच्या जाहीरनामा प्रसिद्ध होणारकेंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षाचा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला आहे. त्यानंतर आता थोड्यच वेळात महाविकास आघाडीचा जाहीरनामा प्रकाशित होणार आहे. त्यामुळे या जाहीरनाम्यातून आगाडी राज्यातील जनतेला काय आश्वासनं देणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
Manifesto of Maharashtra BJP : भाजपच्या संकल्पपत्रातील घोषणालाडक्या बहिणींना 1500 ऐवजी महिन्याला 2100 रुपये देणार.
वृद्ध पेन्शनधारकांना महिन्याला 2100 रुपये देणार.
अंगणवाडी आणि आशा सेवकांना १५ हजारांचं विमा संरक्षण.
25 लाख रोजगार निर्मिती करणार.
शेतमालाची हमीभावाने खरेदी करणार.
शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार.
Amit Shah Live News : अमित शाह जाहीर करणार भाजपचा जाहीरनामाकेंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षाचं संकल्प पत्र प्रकाशित करण्यात आलं आहे. यासाठी भाजपकडून मुंबईत पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेला अमित शाह यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार इत्यादी भाजप नेते उपस्थित होते.
Manoj Jarange Patil Live Press Conference : ज्याला पाडायचं त्याला पाडा - जरांगे पाटीलविधानसभा निवडणुकीत जे आपल्या मतांशी सहमत आहेत त्यांना पाठिंबा द्या, आपलं मत वाया जाऊ देऊ नका, असं आवाहन करत ज्याला पाडायचं त्याला पाडा असा सल्ला मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला दिला आहे. ते सकाळी पत्रकार परिषदेत बोलत होते. तसंच ज्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला त्यांना सोडायचं नाही, असंही ते म्हणाले.
Manoj Jarange Patil Live News : विधानसभा निवडणुकीत कुणाला पाडायचं? जरांगे आज जाहीर करणारविधानसभा निवडणुकीत कुणाला पाडायचं आणि कुणाला पाठिंबा द्यायचा याबाबतचा अंतिम निर्णय मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील आज जाहीर करणार आहेत. सकाळी 10 वाजता ते पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका जाहीर करणार आहेत. त्यामुळे आता जरांगे कोणाला पाठिंबा देणार आणि कुणाच्या विरोधात दंड थोपटणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Satej Patil On Dhananjay Mahadik : धनंजय महाडिकांच्या वक्तव्यावरुन सतेज पाटलांचा हल्लाबोलभाजप खासदार धनंजय महाडिक यांनी लाडकी बहिण योजनेसंदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर महिलांची जाहीर माफी मागितली आहे. मात्र, यावरून आता काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी महाडिक यांना कोंडीत पकडलं आहे. खोटं बोलणं आणि धमकी देणं ही महाडिकांची स्टाईल असल्याचं पाटील यांनी म्हटलं आहे. शिवाय महाडिकांची पार्श्वभूमी गुंडगिरी असल्याच्या मुळेच असली वक्तव्य येतात असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
Dhananjay Mahadik : धनंजय महाडिकांकडून लाडक्या बहिणींची जाहीर माफीखासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूर येथील सभेत लाडकी बहीण योजनेवरून वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यावरून त्यांच्यावर चौफेर टीका होताच 24 तासांच्या आत त्यांनी जाहीर माफी मागितली आहे. शिवाय आपले हे वक्तव्य कुठल्याही माता भगिनींचा अपमान करण्यासाठी नव्हेत विरोधकांकडून आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला जात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
Mahavikas Aghadi Manifesto Live : आघाडीचा वादा आज जाहीर होणारमुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये आज काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यावेळी आघाडीतील सर्व मित्र पक्षातील नेते उपस्थित राहणार आहेत.