अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश यांच्यात 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येत आहे. ही मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. अफगाणिस्तानने बांगलादेशला पराभूत करत विजयी सलामी दिली. बांगलादेशने त्यानंतर दुसऱ्या सामन्यात पलटवार केला. बांगलादेशने करो या मरो असलेल्या दुसऱ्या सामन्यात विजय मिळवला आणि मालिकेतील आव्हान कायम ठेवलं. बांगलादेशच्या या विजयासह मालिका 1-1 ने बरोबरीत आली. त्यामुळे आता तिसरा आणि अंतिम सामना हा रंगतदार होणार असून उभयसंघात कडवी झुंज पाहायला मिळू शकते. हा सामना केव्हा आणि कुठे पाहता येईल? जाणून घेऊयात.
अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश तिसरा सामना सोमवारी 11 नोव्हेंबरला होणार आहे.
अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश तिसरा सामना शारजाह क्रिकेट स्टेडियम, शारजाह येथे होणार आहे.
अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश तिसऱ्या सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 3 वाजता टॉस होईल.
अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश तिसरा सामना टीव्हीवर भारतात दाखवण्यात येणार नाही.
अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश तिसरा सामना मोबाईलवर फॅनकोड एपवर पाहायला मिळेल.
तिसरा आणि अंतिम सामना, कोण जिंकणार मालिका?
बांगलादेश टीम : नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), तनजीद हसन, सौम्या सरकार, मेहिदी हसन मिराझ, तॉहीद हृदोय, महमुदुल्ला, जाकेर अली (विकेटकीपर), नसुम अहमद, तस्किन अहमद, शॉरीफुल इस्लाम, मुस्तफिजुर रहमान, झाकीर हसन, रिशाद हुसेन आणि नाहिद राणा.
अफगाणिस्तान टीम: हशमतुल्लाह शाहिदी (कॅप्टन), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), सेदीकुल्लाह अटल, रहमत शाह, अजमतुल्ला उमरझाई, गुलबदिन नायब, मोहम्मद नबी, रशीद खान, अल्लाह गझनफर, नांगेयालिया खरोटे, फजलहक फारुकी, फरीद अहमद मलिक, इक्रम अलीखिल, दारिश रसूली, रियाझ हसन, नूर अहमद, अब्दुल मलिक, बिलाल सामी आणि नावेद झद्रान.