नाना पटोलेंच्या ‘त्या’ वक्तव्याला ठाकरे गटाच्या नेत्याचं समर्थन; म्हणाले, ‘भाजपचे हाल कुत्र्यासारखे…’
GH News November 12, 2024 07:15 PM

अकोला येथील काँग्रेसच्या प्रचारसभेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. काँग्रेस उमेदवार साजिद खान पठाण यांच्या प्रचारसभेत बोलत असताना  भाजपला कुत्रा बनवण्याची वेळ आल्याचं नाना पटोले म्हणालेत. जे तुम्हाला कुत्रा बोलतात त्या भाजपला तुम्ही मत देणार का? असा सवाल नाना पटोले यांनी मतदारांना केला. तर आता भाजपला कुत्रा बनवण्याची वेळ आली आहे, असं म्हणत नाना पटोले यांनी भाजपवर निशाणा साधला. तर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी नाना पटोले यांनी भाजपबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे समर्थन केले आहे. मतदारांनी भाजपचे कुत्र्यासारखे हाल केले पाहिजे, असं म्हणत अंबादास दानवे यांनी देखील वादग्रस्त वक्तव्य केले आहे. अंबादास दानवे म्हणाले, नाना पटोले यांनी भाजपबद्दल केलेलं वक्तव्य काही वादग्रस्त विधान नाही ते योग्य विधान आहे. तशीच स्थिती भाजपची झाली पाहिजे. कुत्र्यासारखे हाल भाजपचे केले पाहिजेत. भाजप जशी वागते तसेच बोलले पाहिजे, असेही अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे. दरम्यान, नाना पटोले यांच्या वक्तव्याने वाद होण्याची शक्यता असताना आता अंबादास दानवे यांच्या वक्तव्याने नवा वाद होण्याची चिन्ह आहेत.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.