भाजपाचे नेते रावसाहेब दानवे यांच्या लाथ मारण्याच्या एका व्हिडीओवरून विरोधकांनी सध्या त्यांना टीकेचं लक्ष्य केले आहे. रावसाहेब दानवे यांच्या लाथ मारण्याच्या एका व्हिडीओवरून ते चांगलेच चर्चेत आहेत. शिंदे गटाच्या शिवसेनेतील अर्जून खोतकरांचं स्वागत करताना घडलेल्या हा प्रसंग सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. या घटनेनंतर विरोधकांनी रावसाहेब दानवे यांच्यावर हल्लाबोल करत सत्तेचा माज असल्याचे म्हटलंय. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये रावसाहेब दानवे अर्जून खोतकर यांचं स्वागत करत होते. त्याच वेळी शेख मोहम्मद नावाची व्यक्ती दानवेंच्या शेजारी होती. याच व्यक्तीला लाथ मारल्याने रावसाहेब दानवेंवर टीका होतेय. दरम्यान, ज्या व्यक्तीला रावसाहेब दानवे यांनी लाथ मारली, त्यावरून होणाऱ्या टीकेला त्यांनी चुकीचं ठरवलंय. माझी आणि रावसाहेब दानवेंची मैत्री असून दानवेंचा शर्ट विस्कटला होता. तिच गोष्ट मी त्यांना कानात सांगत असताना तो प्रकार घडला. तर खोतकर आणि दानवेच्या फोटोमध्ये तो कार्यकर्ता येऊ नये, म्हणून त्यांनी लाथ मारली असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे.