भाजप आणि काँग्रेसला विचारधारा आहे पण राष्ट्रवादी काँग्रेसची विचारधारा काय? असं म्हणत छगन भुजबळ यांनी स्वतःच्याच पक्षाला विचारधाराधीन असल्याचे म्हणून टाकलंय. ऐरवी पूरोगामीत्वाची विचारधारा सांगणाऱ्या छगन भुजबळ यांनी शरद पवारांच्या टीकेवर बोलताना त्यांनी स्वतःच्याच पक्षावर केलेली टीका चर्चेत आली आहे. भाजपसोबत सत्तेत असताना छगन भुजबळ खोट बोलून गेले होते. त्यांचाही पुनरूच्चार शरद पवारांनी केला. तर राष्ट्रवादीतून फुटून गेलेल्या आमदारांची समजूत काढतो असं सांगून गेलेले छगन भुजबळ सत्तेत सामील झाल्याचे शरद पवारांनी म्हटलंय. मंडल कमिशनच्या मुद्यावरून छगन भुजबळांनी शिवसेना सोडल्याचे बोललं जातंय. मात्र यावेळी शरद पवारांनी आपल्याला प्रवृत्त केलं. मला इच्छा असतानाही मी एकटा कसा फुटू शकतो, असा प्रश्नही छगन भुजबळ यांनी केलाय. दरम्यान, शरद पवारांच्या आवाहनावर जनता भावनेवर नव्हे तर जनता विकासावर मतं देते, असं म्हणत छगन भुजबळांनी शरद पवारांवर पलटवार केलाय. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट