सिंचन घोटाळा आणि सिंचन घोटाळ्याच्या फाईलवरून शरद पवार गट राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केलाय. सुप्रिया सुळे म्हणाल्या, सांगलीमध्ये अजित पवारांनी भाषण केलं. ज्यामध्ये ते असं म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना घरी बोलावलं, एक फाईल दाखवली आणि इन्क्वायरी लावायची शेवटची सही त्यावर देवेंद्र फडणवीसांची होती, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. पुढे त्या असंही म्हणाल्या, 70 हजार कोटी सिंचनाचे आरोप हे देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार आणि राष्ट्रवादीवर केले होते, याची चौकशी झाली पाहिजे, असं म्हणत पुढाकार घेत आरोप करणारे देवेंद्र फडणवीस होते. आरोप झाले इन्क्वायरी लागली, आमचं राज्य गेलं, त्यानंतर देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झालेत. त्यांनी गोपनीयतेची शपथ घेतली. ज्या व्यक्तीवर, ज्या पक्षावर आरोप केले, त्या व्यक्तीला घरी बोलावून फाईल दाखवता, मुख्यमंत्रीच्या घरात बोलून अजित पवारांना ती फाईल दाखवली, हे मी म्हणत नाही अजित पवार असं म्हटले, असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या.