यावेळी पुढे बोलतांना पंकजाताई मुंडे पुढे बोलतांना म्हणाल्या की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस व अजित दादा पवार यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने शेतकरी, लाडक्या बहिणी आदी सर्वांसाठी मोठ्या प्रमाणावर योजना दिल्या. राज्याला स्वयंपूर्णतेकडे नेण्याचा सातत्याने प्रयत्न केला. पंतप्रधान मोदींनी पी एम किसान योजनेतून शेतकऱ्यांना मोठा लाभ मिळवून दिला. गेल्या लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी खोट्या गोष्टी पसरवून भूलथापा देऊन लोकांची दिशाभूल केली. विरोधकांनी अपप्रचार केलेल्या गोष्टी घडल्या नाहीत. संविधान बदलले जाणार नाही तर संविधानाला अधिक सशक्त करण्याचा केंद्र आणि राज्य सरकारचा प्रयत्न आहे.
महायुती सरकारने सर्व घटकांना भरभरून दिले. आता आपण मतदानरुपी आशीर्वाद देऊन महायुतीचे सरकार पुन्हा आणावे. सर्वांनी हात वर करून आणि मूठ आवळून मला वचन द्या की, तुम्ही संजय रायमुलकर यांनाच मतदान कराल. उपस्थित सर्व महिला, पुरुष युवकांनी हात वर करून मूठ आवळत पंकजाताईंच्या आवाहनाला भरभरून प्रतिसाद दिला. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, आमदार संजय रायमुलकर यांनी आपल्या भाषणातून महायुती सरकारने केलेल्या कामांचा लेखाजोखा सादर करत धनुष्यबाण चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन केले. प्रल्हादराव सुलताने, भगवानराव कोकाटे, संतोषभाऊ मापारी, प्रकाश पोफळे, नंदूभाऊ मापारी, नीरज रायमुलकर, समाधान साठे, राजीव तांबिले, बाबूसिंग जाधव, अंजलीताई गवळी, आशाताई झोरे महायुतीतील घटक पक्षांचे मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितेंद्र घुले यांनी केले.