डायबिटीजपासून वेळीच राहा सावध, ही 7 लक्षणे दिसताच तपासणी करा
GH News November 14, 2024 06:15 PM

Diabetes हा सध्याच्या काळातील सर्वात गंभीर आजार बनला आहे. ज्यामुळे जगभरातील लोक त्रस्त आहेत. भारतात गेल्या काही काळापासून डायबिटीजच्या प्रकरणात मोठी वाढ होत आहे. त्यामुळे सध्या भारताला डायबिटीजची जागतिक राजधानी मानली जात आहे.त्यामुळे या आजाराच्या बद्दल जनजागृती केली जात आहे. यामुळे दरवर्षी 14 नोव्हेंबर रोजी World Diabetes Day 2024 साजरा केला जातो. या आर्टीकलमध्ये डायबिटीजच्या काही लक्षणांबद्दल आपण माहिती घेणार आहोत. त्यामुळे आपल्याला हा आजार ओळखण्यास मदत होईल.

डायबिटीजबद्दल येथे जी माहिती देण्यात आली आहे. या माहितीचा वापर करुन आपण वेळीच जर सावधानता बाळगली तर आपल्या या गंभीर आजारापासून वाचता येईल.या संदर्भात तज्ज्ञांनी डायबिटीजची काही सुरुवातीचे लक्षणं दिलेली आहेत. याच्या मदतीने आपण वेळीच या आजाराची ओळख करुन घेत उपचार सुरु केले तर फायदा होईल.

वारंवार लघवीला येणे

जर तुम्हाला वारंवार लघवीला येत असेल किंवा वारंवार तहान लागत असेल तर हा डायबिटीजचा संकेत होऊ शकतो. हाय ब्लड शुगर लेव्हलमुळे व्यक्तीला वारंवार लघवीला होऊ शकते. जादा तहान लागल्याने आपण वारंवार पाणी प्यायला लागतो. त्यामुळे आपल्याला वारंवार लघवीला येऊ शकते.

खूप थकायला होणे

अनियंत्रित डायबिटीजमुळे कोणत्याही व्यक्तीचा एनर्जी लेव्हल ढासळू लागते. त्यामुळे त्यावर इतर सर्वसामान्य व्यक्ती पेक्षा थकायला लवकर होते.

ब्लर व्हिजन होणे

जर तुमचे व्हिजन ब्लर झाले असेल, म्हणजे तुम्हाला दिसायला अंधूक आणि धूसर दिसत असेल तर याकडे अजिबात दुर्लक्ष करु नका. कारण तुम्हाला हे डायबिटीजचे सुरुवातीचे लक्षण असू शकते. असे तेव्हा होते. जेव्हा आपली ब्लड शुगर लेव्हल प्रचंड वेगाने वाढलेली असते. डोळ्यांनी धुरकट दिसणे. तसेच काळे डाग दिसणे तसेच कधी-कधी दृष्टी अधू होण्यापर्यंत धोका असू शकतो.

अचानक वजन कमी होणे

जर तुमचे वजन अचानक काही कारण न नसताना कमी होत असेल, तर या हलक्यात घेऊ नका. कारण अचानक आपले वजन कमी होणे हे देखील डायबिटीजच्या सुरुवातीच्या लक्षणापैकी एक आहे.

वारंवार इन्फेक्शन होणे

आपल्या रक्तात साखरेचे प्रमाण वाढल्याने वारंवार आपल्या इन्फेक्शन होण्याचा देखील त्रास होतो. त्यामुळे वारंवार त्वचेचे इन्फेक्शन होणे हे देखील एक डायबिटीजच्या सुरुवातीच्या लक्षणापैकी एक आहे.खास करुन यात जेनिटल यीस्ट इन्फेक्शनचा धोका वाढत जातो.

हाता – पायांना झिणझिण्या येणे,सुन्न होणे

ब्लड शुगर लेव्हल वाढल्याने आपल्या मज्जा संस्थेवर परिणाम होत असतो. ज्यामुळे काही वेळा हाता-पायांना सुन्नता येणे, झिणझिण्या येणे, आणि हात पाय दुखणे असा त्रास सुरु होतो.

मानेजवळ पिग्मेंटेशन

इन्सुलिन रेजिस्टेंसच्या कारणांनी मानेजवळ, काखेत आणि कंबरेवरील त्वचेवर गडद डाग पडतात.ते सर्वसाधारणपणे हायब्लड शुगरमुलळे दिसतात.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.