Black Pav Bhaji Of Mumbai: मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची पावभाजी मिळते. पण तुम्ही कधी काळी पावभाजी खाल्ली आहे का ? मुंबईत काळी पावभाजी मिळते. खासदार प्रणिती शिंदे यांनी विषय खोल या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत काळ्या पावभाजीचा उल्लेख केला आहे. (Black Pav Bhaji)
प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी मुलाखतीत सोलापुरातल्या आणि मुंबईतल्या (Mumbai News) आवडणाऱ्या पदार्थांविषयीची माहिती दिली. कोणत्या ठिकाणी कोणता पदार्थ चांगला मिळतो, हे त्यांनी सांगितलं. प्रणिती शिंदे मुंबईतील खाण्याच्या आवडीच्या ठिकाणांविषयी म्हणाल्या की, मुंबईत सुखसागरची पावभाजी आणि बाबुलनाथचा डोसा खूप छान आहे. ब्रीच कँडीजवळच्या गल्लीत सँडविच खूप छान मिळतं. (Praniti Shinde Favourite Food Places In Mumbai)
मुंबईतल्या बेस्ट वडापावविषयीही (Best Vada pav Of Mumbai) त्यांनी मुलाखतीत माहिती दिली. त्या म्हणाल्या की, वरळीला सदानंद हॉटेलच्या बाहेर एक गाडी लागते तिथे अस्सल वडापाव मिळतो. मुंबईतल्या इतर ठिकाणांची माहिती दिल्यानंतर त्यांनी काळ्या पावभाजीचा उल्लेख केला. मुंबईत पार्ल्याला काळी पावभाजी मिळते. काळी पावभाजी हे नाव वाचून आश्चर्यचकित होऊ नका. या पावभाजीत काळ्या मसाल्याचा वापर केला जातो. त्यामुळे याला काळी पावभाजी म्हटलं जातं.
ही काळी पावभाजी पार्ल्यात नेमकी कोणत्या जागी मिळते, हे प्रणिती यांनी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं नाही पण सोशल मीडियावर काही फुड व्लॉगर्सनी काळ्या पावभाजीचे व्हिडिओ शेअर केले आहेत. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पावभाजीच्या ठिकाणांची अनेक नावे सापडतील. या नावांमध्ये मारुती पावभाजी, जय भवानी पावभाजी या ठिकाणांचा उल्लेख केल्याचंही आढळेल.
https://www.youtube.com/watch?v=1HZBevQt_Dc
प्रणिती शिंदे यांनी या व्हिडिओमध्ये सोलापूरमधील (Solapur Famous Pav Bhaji) एका पावभाजीचाही उल्लेख केला. त्यांनी सुप्रजाची पावभाजी अप्रतिम असते,असं म्हटलं आहे. प्रणिती शिंदे सोलापुरातून बाहेर जाताना नेहमी सुप्रजाची पावभाजी घेऊन जातात. प्रणिती शिंदे यांच्या मुलाखतीचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवरुन त्या किती Foodie आहेत, याची कल्पना येते.