Aditya Roy Kapoor : व्हायचं होतं क्रिकेटर, झाला अभिनेता; एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले
Saam TV November 16, 2024 04:45 PM

आशिकी 2 फेम आदित्य कपूरचा (Aditya roy kapoor) आज वाढदिवस आहे. २०१३ मध्ये रिलीज झालेल्या अदित्यच्या पहिल्याच चित्रपटाने त्याला प्रचंड यश मिळवून दिले. बॉलिवूडमध्ये आदित्यने त्यांच्या अभिनयाने दमदार छाप उमटवली आहे. आदित्य रॉय कपूर हा त्याच्या प्रोफेशनल लाईफसह पर्सनल लाईफमुळे चर्चेत राहिला आहे. आज आदित्य रॉय कपूर त्याचा ३९ वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्त आदित्यच्या सिनेसृष्टीतील कारकीर्द जाणून घेऊया.

आदित्य रॉय कपूर यांचा जन्म १६ नोव्हेंबर १९८५ मध्ये मुंबईतमध्ये झाला आहे. आदित्य आज ३९ वर्षाचा झाला आहे. आदित्य रॉय कपूरला लहानपणापासून क्रिकेट खेळण्याची आवड होती. त्या क्रिकेटर (Cricketer) व्हायचे होते. शाळेमध्ये असताना आदित्य रॉय कपूर क्रिकेट खेळण्यामध्ये लक्ष द्यायचा. मात्र आदित्यची आई शाळेत नाटक दिग्दर्शित करायची यामुळे त्यालाही अभिनयाची आवड निर्माण झाली. यानंतर आईकडून अभिनयाचे धडे मिळाल्यानंतर आदित्यने सिनेसृष्टीत पदार्पण केले.

आदित्य रॉय कपूरने त्याच्या सिनेसृष्टीतील करिअरची सुरूवात सुपरस्टार अजय देवगण आणि सलमान खानच्या लंडन ड्रीम्स चित्रपटातून केली. यानंतर त्याने गुजारिश आणि अॅक्शन रिप्ले हे चित्रपट केले. आदित्य रॉय कपूरने आपल्या चित्रपट कारकिर्दीत ये जवानी है दिवानी, डियर जिंदगी, फितूर यासारख्या चित्रपटात काम केले आहे. मात्र त्याला खरी लोकप्रियता मिळाली ती म्हणजे आशिकी 2 या चित्रपटातूनच. आशिकी 2 मध्ये श्रद्धा कपूर आणि आदित्यची केमिस्ट्री सर्वांनाच आवडली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला.

आदित्य रॉय कपूर अलिशान लाईफ जगतो आहे. अभिनेता एका चित्रपटासाठी ५ ते ६ कोटी रुपये घेतो. तो महिन्याला सुमारे ७० लाख रुपये कमावतो. आदित्य एका वर्षात १ कोटींहून अधिक कमावतो. याशिवाय तो मुंबईतही त्याचे स्वत:चे अतिशय आलिशान अपार्टमेंट आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.