उद्धव ठाकरे पोलीस स्टेशन : मी सभा घेण्याची गरज नाही, पण केंद्रबिंदू इथे आहे आणि केंद्रबिंदूला मशाल लावली तर संपूर्ण महाराष्ट्र गद्दार मुक्त होईल, असं विधान ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केली. ठाणे विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे ठाण्यात जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (मराठी) यांच्यावर हल्लाबोल केला.
गचके खात खात तुमच्यापर्यंत पोहचलो. कुठेही भाषण करायची गरज नाही. मी ठाण्यात आलोय कारण गद्दारीचा केंद्रबिंदू इथे आहे. त्या गद्दाराच्या बुडाला मशाल लावायची आहे. ठाण्याला गद्दारीचा कलंक लागला आहे, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. तसेच ठाणे महापालिकेला यांनी भिकेला लावलं आहे. 90 हजार कोटींच्या ठेवी यांच्या कंत्राटदारांनी लुटल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माझं नाव नाही घेतलं , आता नाव घेताना थरथरत होते. मागच्या वेळी नकली संतान बोलले, तेव्हा महाराष्ट्राने पेकाटात लाथ मारली, असा निशाणा उद्धव ठाकरेंनी साधला.
गुजरातला हे लोक ढोकळा खायला गेले. ठाण्यातली मिसाळ खायची ना…काही लोकांना खूप आवडते मिसळ खायला. मागच्यावेळी बिनशर्ट पाठिंबा दिला. आता इनशर्ट पाठींबा दिला, अशी टीका उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंवर केली. तसेच मला विचारतात एक जागा का सोडली नाही?, मी का सोडू, यांना लुटायला सोडायची का?, कोणत्याही लुटणाऱ्या लोकांना जागा सोडणार नाही.. असं विधानही उद्धव ठाकरेंनी माहीम विधानसभेच्या जागेवरुन केला. या ठिकाणी तुम्ही मत आता दुसऱ्यांना दिला तर आता आपलं खरं नाही. आपण गुनसेला मत देणार का?, गुजरात नवनिर्माण सेना…आता मनसे नाही राहिली, गुनसे झाली, असं उद्धव ठाकरेंनी टीकास्त्र सोडलं.
येत्या २० नोव्हेंबरला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, राज्यात आदर्श आचारसंहिता लागू आहे. या काळात राज्यात अनेक ठिकाणी आचारसंहिता भंगाच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. शनिवारपर्यंत एकूण सात हजार ८२० तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी सात हजार ७८४ तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. दरम्यान, या कालावधीत राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांनी १५ ऑक्टोबरपासून बेकायदा पैसे, दारू, अमली पदार्थ, मौल्यवान धातू आदींसंबंधी केलेल्या कारवाईत एकूण ५५७ कोटी ७६ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. राज्यभर आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी सुरू असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
अधिक पाहा..