ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
abp majha web team November 18, 2024 09:13 PM

1. विधानसभा निवडणुकांसाठी दिग्गजांच्या सभांनी राज्यभर धुरळा! प्रचाराच्या तोफा थंडावल्या, आता 'लक्ष्मीदर्शना'ची चर्चा, छुपा प्रचार सुरू https://tinyurl.com/yn8x2vzm  जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय, बारामतीच्या शेवटच्या सभेत प्रतिभा पवारांनी झळकावलेल्या बॅनरची राज्यात चर्चा https://tinyurl.com/57zdju6v 
 
2. देशाच्या कानाकोपऱ्यात गेलं तर बारामती म्हटलं की कुणाचं नाव घेतात? आता हीच परंपरा युगेंद्र पवार पुढे नेतील, बारामतीमधील सांगता सभेत शरद पवाराचं लक्षवेधी भाषण https://tinyurl.com/53ke6r3y  लोकसभेला कुणीच नव्हतं, पण आता माझ्यासोबत आई, बहिणी आणि संपूर्ण कुटुंब,बारामतीत अजित पवारांची भावूक अन् मिश्कील फटकेबाजी; विधानसभेच्या सांगता सभेत लढाई भावनिक वळणावर https://tinyurl.com/4pscaccw  

3. आधी शरद पवार म्हणाले थोरातांकडे नेतृत्त्व, आता जयंत पाटीलही रेसमध्ये, मुख्यमंत्रिपदावर बोलताना थेट म्हणाले; इच्छा तर प्रत्येकाचीच असणार https://tinyurl.com/mr44dh6y  शरद पवारांनंतर सुप्रिया सुळेंचं मुख्यमंत्रिपदाच्या चर्चांवर मोठं विधान; बाळासाहेब थोरातांचे नाव घेत संगमनेरकरांच्या मनातली इच्छा सांगितली https://tinyurl.com/3wpyrwtd 

4. शरद मोठा वटवृक्ष आहे, ही गर्दी पाहून मला वाटतं हसन मुश्रीफ गाडला जाणार, कागलच्या सभेत शरद पवारांच्या बहीण सरोज पाटील यांचा जोरदार हल्लाबोल https://tinyurl.com/mr4x8r76  धंद्यात मदत केली, जिल्हा परिषद , मंत्रिपद सगळं काही दिलं, पण हा रुपया खोटा निघाला, दत्तात्रय भरणेंना पाडा, शरद पवार इंदापुरात आक्रमक https://tinyurl.com/4xxa7x53  

5. सोडून गेलेले आमदार गद्दार नव्हे, खरा गद्दार उद्धव ठाकरे; बाळा नांदगावकरांसाठीच्या सभेत राज ठाकरे शिवडीत गरजले https://tinyurl.com/ykjj48yb   तुम्ही ठाकरे आहात तर ठाकरेंसारखं वागा, दिल्लीचे बूट चाटू नका; संजय राऊतांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल https://tinyurl.com/2s4hdbue 

6. निवडणूक निकालाच्या 23 तारखेनंतर फडणवीस-शिंदेंना पोलीस ठाण्यात हेलपाटे मारावे लागतील, दयामाया दाखवणार नाही, संजय राऊतांचा इशारा https://tinyurl.com/w76jpccy  आपल्या राजाच्या वडिलांच्या नावाची बदनामी नको; शहाजी नाव काढून खोके पाटील ठेवा, सांगोल्यातून संजय राऊतांचा शहाजी बापू पाटलांना टोला https://tinyurl.com/2xjy3sn3 

7. जिंतूर मतदारसंघात मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ क्लिप व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर https://tinyurl.com/495v26ny  कालीचरण महाराजांची मनोज जरांगेंवर दातओठ खात टीका, म्हणाले, मनोज जरांगे हिंदुत्व तोडण्यासाठी निघालेला राक्षस https://tinyurl.com/y4dhy3rb 

8. जळगावात अपक्ष उमेदवार शेख अहमद हुसैन गुलाम हुसैन यांच्या घरावर पहाटे गोळीबार, तीन राऊंड फायर; पोलीस घटनास्थळी दाखल https://tinyurl.com/58xdj98m  टपाली मतदान करताना फोटो काढला, थेट गावी मित्रांना पाठवला; शिवडीत कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई https://tinyurl.com/4kvwrucv 

9. प्रचाराच्या शेवटच्या तासात राहुल गांधींचा 'पोस्टर बॉम्ब', सर्वांसमोर तिजोरी खोलून भाजपावर 5 मोठे हल्ले; म्हणाले नरेंद्र मोदी, अमित शाह एक आहेत, गौतम अदानी सेफ आहेत  https://tinyurl.com/44dbec8t  जुने फोटो दाखवत भाजप नेते विनोद तावडे म्हणाले, हे अदानी कोणाचे? काँग्रेसच्या फोटोंना भाजपकडून फोटोने उत्तर, राहुल गांधी फेक है चा नारा https://tinyurl.com/bckhj7xu 

10. भुवनेश्वर कुमारच्या गळ्यात पडली कर्णधारपदाची माळ, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी यूपी संघाची घोषणा!
https://tinyurl.com/bd5rzfkr    

*माझा स्पेशल*

उद्धव ठाकरे म्हणजे खाष्ट सासू, 3 सूनांचं उदाहरण देत राज ठाकरेंचा हल्ला, सर्वांत आक्रमक भाषण https://tinyurl.com/4fhwsaew 

'परिवार माझा एकवटला...', बारामतीत अजित पवारांच्या प्रचाराची सांगता; सभेला दादांसाठी गर्दी किती?
https://tinyurl.com/yc543uwk 

लग्नसराईत खुशखबर! 7 दिवसांत सोनं तब्बल 'इतक्या' रुपयांनी स्वस्त; 10 ग्रॅमसाठी किती पैसे?
https://tinyurl.com/3t66je8z 

एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.