India Most Expensive TV Show: 'सिंघम अगेन' (Singham Again), 'भूल भुलैया 3' (Bhool Bhulaiyaa 3) नंतर बॉक्स ऑफिसवर (Box Office) साऊथ सिनेमा (South Cinema) कंगुवानं (Kanguva) दणक्यात एन्ट्री घेतली. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या कंगुवानं बॉक्स ऑफिसवर 100 कोटींहून अधिक कमाई केली आहे. मात्र, चित्रपटाचं बजेट 350 कोटी रुपये आहे. त्यामुळे आता चित्रपट बजेटही वसूल करतो की, नाही ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. हा आतापर्यंतचा सर्वात महागडा भारतीय चित्रपट (Expensive Indian movie) असल्याचं बोललं जात आहे. पण, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, भारतातील सर्वात महागड्या टीव्ही शोपुढे कंगुवाचं बजेट काहीच नाही. या टेलिव्हिजन शोवर निर्मात्यांनी तब्बल 500 कोटी रुपये खर्च केले आहेत.
हा टेलिव्हिजन शो 2017-18 मधील ऐतिहासिक नाटक 'पोरस' आहे, जी भारतातील सर्वात महागडी टीव्ही मालिका आहे. फर्स्टपोस्टनं 2017 मध्ये दिलेल्या अहवालानुसार, या शोचे बजेट 500 कोटी रुपये होतं, जे त्यावेळी भारतात बनवलेल्या कोणत्याही चित्रपटापेक्षा खूप महाग होतं. तेव्हापासून तीन चित्रपटांनी हा आकडा पार केला आहे, ज्यात 'आदिपुरुष', 'आरआरआर' आणि 'कल्की 2898 एडी' यांचा समावेश आहे.
'पोरस' हा आतापर्यंतच्या बिगबजेट चित्रपटांपेक्षाही महागडा प्रकल्प आहे. 'बाहुबली 2' (250 कोटी), 'ब्रह्मास्त्र पार्ट वन' (350 कोटी), 'जवान' (350 कोटी), आणि नुकताच प्रदर्शित झालेला 'सिंघम अगेन' (350 कोटी) यांचाही समावेश आहे.
'पोरस'ची कथा याच नावाच्या ऐतिहासिक पौरव राजावर आधारित आहे, ज्यानं इसवी सनपूर्व चौथ्या शतकात ग्रीक सम्राट अलेक्झांडरशी युद्ध केलं होतं. हा शो खूप भव्य दिव्य करण्यात आला होता, निर्मात्यांनी तो 'बाहुबली' चित्रपट मालिकेसारखा भव्य बनवण्याचा विचार केला होता. सेट मोठ्या प्रमाणावर बांधले गेले आणि टॉप VFX सुपरवाइजर्सना नियुक्त करण्यात आलं. शोमध्ये दाखवण्यात आलेल्या युद्धाचं शुटिंग करण्यासाठी हजारो एक्स्ट्रा कलाकारांना कामावर ठेवण्यात आलं होतं.
संपूर्ण शोचं अर्ध्याहून अधिक प्रॉडक्शनचं काम परदेशात झालं होतं. ज्यामुळे खर्च अधिक वाढला. याचाच अर्थ, सरसरी 299 एपिसोड्सच्या सीरिजच्या एका एपिसोडसाठी जवळपास 1.70 कोटींचा खर्च आला. यामुळे या मालिकेनं टेलिव्हिजन शो 'सूर्यपुत्र कर्ण' चा विक्रम मोठ्या फरकाने सहज मोडला. 'सूर्यपुत्र कर्ण'चे बजेट सुमारे 250 कोटी होते.
स्वस्तिक प्रॉडक्शनचे सिद्धार्थ कुमार तिवारी निर्मित, 'पोरस' 27 नोव्हेंबर 2017 रोजी सोनी टीव्हीवर प्रदर्शित झाला आणि सुमारे एक वर्षानंतर संपला. या शोमध्ये लक्ष्य लालवानी मुख्य भूमिकेत होता, तर रोहित पुरोहित सिकंदरच्या भूमिकेत दिसला होता.
शोच्या इतर मुख्य कलाकारांमध्ये रती पांडे, आदित्य रेड्डी, समिक्षा, मोहित अब्रोल आणि सनी घनशानी आणि इतर बरेच कलाकार होते. 'पोरस'ला खूप प्रशंसा मिळाली आणि अनेक वेबसाइट्सनी त्याला 'टीव्हीचा बाहुबली' असंही संबोधलं. एशियन टेलिव्हिजन अवॉर्ड्समध्ये तिवारीच्या सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाच्या पुरस्कारासह या शोनं तीन आंतरराष्ट्रीय पुरस्कारही जिंकले.