‘वन नेशन वन इलेक्शन’मुळे विरोधक संपणार…,’ काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार
GH News December 12, 2024 09:13 PM

‘वन नेशन वन इलेक्शन’ हा कायदा संसदेत मांडला मंजूरीसाठी मांडला जाणार आहे. ‘वन नेशन वन इलेक्शन’ कायद्यामुळे देशाच एकाच वेळी विधानसभा आणि लोकसभा निवडणूका घेतल्याने निवडणूक आयोगाचा म्हणजे पर्यायाने देशाचा पैसा वाचणार आहे. अगदी तंतोतंत पालन केले तर चार हजार कोटी रुपयांचा खर्च वाचणार आहे. हा कायदा आपली इकॉनॉमी फाईव्ह ट्रीलियन डॉलर करण्यासाठी महत्वाचा आहे. देशात वर्षभरात कुठे ना कुठे निवडणूका सुरु असतात. त्यामुळे आचारसंहिता लागू होऊन लोकोपयोगी कामे करता येत नाहीत असे भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.या कायद्यावर खरे तर काँग्रेसने देखील चर्चा केली होती. परंतू निर्णय घेऊ शकले नाही. ईव्हीएम देखील त्यांनीच आणले आता विरोध करीत आहेत. शरद पवार आणि अजितदादा यांची भेट झाल्याप्रकरणात कोणतेही राजकारण नाही ते एकत्र कुटुंब आहे. कुटुंब वेगळे झालेले नाही.त्यांचे रस्ते वेगळे झाले आहे, शरद पवार राहुल गांधींच्या दिशेने चालले आहेत. तर अजित पवार मोदींच्या दिशेने जात आहे. वन इलेक्शन वन नेशन मुळे विरोधक संपतील असे काही नाही विरोधक त्यांच्या चुकीमुळे संपत आहेत त्याला मोदी कसे जबाबदार असणार असा सवालही सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.