Sharad Pawar: म्होरक्याला अटक करा; तो आणखी सात गुन्हेगार तयार करेल; चिमुकल्या वैभवीची शरद पवारांकडे मागणी
esakal December 21, 2024 07:45 PM

Beed Latest News: म्होरक्याला अटक करा नाही तर तो आणखी सात गुन्हेगार तयार करेल, माझ्या वडिलांना न्याय द्या, अशी आर्त मागणी अपहरण करुन निर्घुण खुन केलेल्या सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख हीने राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांसमोर केली.

शरद पवार यांनी संतोष देशमुख यांच्या कुटूंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी वैभवी देशमुख हीने पवारांसमोर म्होरक्याला अटक करावी अशी मागणी केली. ता. नऊ डिसेंबरला मस्साजोग (ता. केज) येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन निर्घुण हत्या करण्यात आली.

या प्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा तत्कालिन केज तालुकाध्यक्ष विष्णू चाटेसह सुदर्शन घुले, प्रतिक घुले आदी सात आरोपींवर अपहरण व खुनाचा गुन्हा नोंद झाला आहे. पोलिसांनी यातील विष्णू चाटेसह अन्य तिघांना अटक केली आहे. मात्र, या खुनाच्या घटनेचे मुुळ हे पवनचक्की प्रकल्पातील भांडण आणि खंडणीशी आहे.

ता. सहा डिसेंबरला मस्साजोगच्या पवनचक्की ्रपकल्पाच्या कार्यालयात सुदर्शन घुलेसह त्याच्या साथीदारांनी खंडणीसाठी भांडणे केली होती. येथील दलित वॉचमनला मारहाण केली होती. मात्र, केज पोलिसांनी अॅ्रटॉसिटी व खंडणीची फिर्याद नोंदवून घेतली नाही.

त्यामुळे आरोपींचे मनोबल वाढले आणि आपल्याला यंत्रणेचे पाठबळ असल्याने दिवसाढवळ्या अपहरण करुन संतोष देशमुख यांचा खुन करण्यात आला. दरम्यान, खुनाच्या घटनेनंतर दोन दिवसांनी धनंजय मुंडे समर्थक वाल्मिक कराड, खुन प्रकरणातील विष्णू चाटे व सुदर्शन घुले यांच्यावर अवादा कंपनीच्या कर्मचाऱ्याला दोन कोटींची खंडणी मागीतल्याचा गुन्हा नोंद झाला. तर, तीन दिवसांपूर्वी खुन ्रपकरणातील आरोपींवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंद झाला.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.