SA vs PAK : पाकिस्तानकडे विजयी हॅटट्रिकची संधी, दक्षिण आफ्रिका लाज राखणार? तिसरा आणि अंतिम सामना केव्हा?
GH News December 22, 2024 01:08 AM

पाकिस्तान क्रिकेट टीम सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. उभयसंघात टी 20I मालिका पार पडली. यजमान दक्षिण आफ्रिकेने या मालिकेतील सलग 2 सामने जिंकले. दक्षिण आफ्रिकेने यासह मालिका खिशात घातली. तर तिसरा सामना हा पावसामुळे आणि हवामानामुळे रद्द झाला. त्यानंतर एकदिवसीय मालिकेला सुरुवात झाली. पाहुण्या पाकिस्तानने सलग 2 सामने जिंकले आणि टी 20I मालिकेतील पराभवाचा वचपा घेतला. पाकिस्तान या मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे. पाकिस्तानला आता त्यानंतर तिसरा आणि अंतिम सामना जिंकून दक्षिण आफ्रिकेला क्लिन स्वीप करण्याची संधी आहे. तर दक्षिण आफ्रिकेसमोर अंतिम सामना जिंकून लाज राखण्याचं आव्हान असणार आहे.

दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान तिसरा सामना केव्हा?

दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान तिसरा सामना रविवारी 22 डिसेंबरला होणार आहे.

दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान तिसरा सामना कुठे?

दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान तिसरा सामना वांडरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग येथे होणार आहे.

दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान तिसऱ्या सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान तिसऱ्या सामन्याला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 5 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 5 वाजता टॉस होईल.

दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान तिसरा सामना टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहता येणार?

दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान तिसरा सामना टीव्हीवर स्पोर्ट्स 18 नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर सामना मोबाईलवर जिओ सिनेमा एपवर पाहायला मिळेल.

दक्षिण आफ्रिका टीम: टेम्बा बावुमा (कॅप्टन), टोनी डी झोर्झी, रॅसी व्हॅन डर डुसेन, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), डेव्हिड मिलर, मार्को जॅनसेन, अँडिले फेहलुकवायो, ब्योर्न फोर्टुइन, क्वेना माफाका, तबरेझ शम्सी, कॉर्बिन बॉश, कागीसो रबाडा, रायन रिकेल्टन आणि ट्रिस्टन स्टब्स.

पाकिस्तान संघ: मोहम्मद रिझवान (कॅप्टन आणि विकेटकीपर), सैम अयुब, अब्दुल्ला शफीक, बाबर आझम, सलमान आगा, कामरान गुलाम, इरफान खान, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ, अबरार अहमद, मोहम्मद हसनैन, उस्मान खान, तय्यब ताहिर आणि सुफियान मुकीम.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.