टीम इंडियाचा वेगवान आणि प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह याने 2024 या वर्षात आतापर्यंत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. बुमराहने मायदेशात आणि परदेशात बॉलिंगने चमक दाखवली आहे. बुमराह सध्या सुरु असलेल्या बॉर्डर गावसकर ट्रॉफी कसोटी मालिकेतही धमाका करतोय. बुमराहने या 5 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या 3 सामन्यांमध्ये 10.90 च्या स्ट्राईक रेटने 21 विकेट्स घेतल्या आहेत. तर चौथा सामना हा 26 डिसेंबरपासून मेलबर्न क्रिकेट ग्राउंड अर्थात एमसीजी येथे होणार आहे. बुमराहला या सामन्यात महारेकॉर्ड करण्याची संधी आहे. बुमराहकडे मेलबर्नमध्ये इतिहास घडवण्याची संधी आहे.
टीम इंडियाची माजी कर्णधार आणि ऑलराउंडर कपिल देव यांच्या नावावर असंख्य विक्रम आहेत. कपिल देव हे टीम इंडियासाठी 200 विकेट्स घेणारे एकमेव वेगवान गोलंदाज आहेत. देव यांनी 50 व्या कसोटी सामन्यात ही कामगिरी केली आहे. आता बुमराहला हाच विक्रम मोडीत काढण्याची संधी आहे. बुमराहने आतापर्यंत त्याच्या कसोटी कारकीर्दीत 43 सामन्यांमध्ये 19.53 च्या सरासरीने 194 विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे बुमराहला मेलबर्नमध्ये 6 विकेट्स घेण्याची गरज आहे. बुमराहने अशी कामगिरी केल्यास तो वेगवान 200 विकेट्स घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरेल.
बुमराहने आतापर्यंत मेलबर्नमध्ये चांगली कामगिरी केली आहे. बुमराहने मेलबर्नमध्ये एकूण 15 विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे आता बुमराहने मेलबर्नमध्ये 6 विकेट्स घेण्यासह भारताला विजय मिळवून द्यावा,अशी आशा भारतीय क्रिकेट चाहत्यांची असणार आहे.
अंतिम 2 सामन्यांसाठी ऑस्ट्रेलिया संघ : पॅट कमिन्स (कर्णधार), शॉन ॲबॉट, स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, ट्रेव्हिस हेड (उपकर्णधार), जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, सॅम कोन्स्टास, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, मिचेल मार्श, झाय रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ (उपकर्णधार), मिचेल स्टार्क आणि ब्यू वेबस्टर.
बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, अभिमन्यु ईश्वरन, देवदत्त पडिक्कल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), सर्फराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नीतीश कुमार रेड्डी आणि वॉशिंगटन सुंदर.