Winter Sleep: थंडीत जास्त झोप का येते? जाणून घ्या त्या मागची रंजक कारणे
Times Now Marathi December 22, 2024 02:45 AM

Winter Sleep: हिवाळ्याच्या हंगामाला सुरुवात झाली असून थंड वातावरणाचा परिणाम आपल्या एकंदरीत आरोग्यावर पडू लागला आहे. यात दिवस छोटा आणि रात्र मोठी असल्याकारणामुळे अनेकांना या काळात प्रचंड झोप येते. पण तुम्ही कधी हा विचार केला आहे का की, नेमकी हिवाळ्यातच जास्त झोप का येते? चला जाणून घेऊया.

जसजशी थंडी वाढत जाते, तसतसे सकाळी उठणे अनेकांना अवघड होऊन जाते. अनेक लोकं बराच वेळ पलंगावर असेच पडून राहतात. थंड वातावरणामुळे अंग जड होते, जे काम करून देत नाही, अशी अनेकांची तक्रार असते. पण तुम्हाला माहित आहे का की याला फक्त थंड हवामानच जबाबदार नाही तर आपल्या शरीरात होत असलेले काही महत्त्वाचे जैविक आणि शारीरिक बदल देखील आहेत. हिवाळ्यात, दिवस लहान असतात आणि रात्र लांब असतात, ज्यामुळे आपल्या सर्कॅडियन लयीवर म्हणजेच शरीराच्या घड्याळावर त्याचा परिणाम होतो, त्यामुळे या लेखात आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की हिवाळ्यात जास्त झोपेची शास्त्रीय कारणे कोणती आहेत आणि त्यांचा आपल्या शरीरावर कसा परिणाम होतो. चला तर मग सुरुवात करूया.

थंडीत जास्त झोप येण्याचे काही प्रमुख कारणे हिवाळ्यात जास्त झोप येण्यामागे अनेक शास्त्रीय कारणे आहेत. येथे जाणून घ्या की जास्त झोप का येते?

मेलाटोनिनचे प्रमाण वाढते
हिवाळ्यात कमी सूर्यप्रकाशामुळे शरीरात मेलाटोनिन हार्मोनचे उत्पादन वाढते. हा हार्मोन आपल्या झोपेचे चक्र नियंत्रित करतो. मेलाटोनिनचे प्रमाण वाढले की शरीराला जास्त थकवा जाणवतो आणि झोपेची इच्छा वाढते. त्यात थंडीत दिवसा कमी प्रकाश आणि रात्री जास्त काळोख यामुळे शरीराच्या अंतर्गत घड्याळावर परिणाम होतो त्यामुळे झोपेची गरज वाढते. यामुळे शरीरातील उर्जा पातळी कमी होते आणि जास्त झोप लागते.

हे देखील वाचा:

हिवाळ्यात कमी शारीरिक हालचाली
हिवाळ्याच्या काळात लोक कमी बाहेर जातात आणि शारीरिक हालचालीही कमी होतात. कमी शारीरिक हालचालींमुळे शरीरात ऊर्जा संचारत नाही आणि यामुळे जास्त थकवा जाणवतो. त्यामुळे झोपण्याची इच्छा वाढते.

व्हिटॅमिन डीची कमतरता
हिवाळ्यात सूर्यप्रकाश कमी असतो आणि त्यामुळे व्हिटॅमिन डीची पातळी कमी होऊ शकते. व्हिटॅमिन डीची पातळी कमी झाल्यामुळे शरीरात थकवा आणि अशक्तपणा येऊ शकतो. त्यामुळे जास्त झोप लागते. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे, शरीराला अधिक विश्रांती आणि अधिक झोपेची आवश्यकता असते.

हे देखील वाचा:

शरीराचे तापमान नियंत्रण
थंडीत शरीराला उब राखण्यासाठी जास्त ऊर्जा लागते. या प्रक्रियेमध्ये शरीर अधिक काम करते, त्यामुळे थकवा वाढतो आणि झोप लागण्याची प्रवृत्ती अधिक होते.

वातावरणाची शांती
थंडीत बाह्य आवाज कमी होतात, आणि वातावरण देखील शांत होते. हे मानसिक शांततेसाठी अनुकूल असते, ज्यामुळे झोपण्याची प्रवृत्ती वाढते.
© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.