पिंपरी चिंचवड : रस्त्यावर किंवा उपहारगृहात विविध खाद्यपदार्थ विक्रीसाठी उपलब्ध असतात. काही ठिकाणी स्पेशल पदार्थ केला जाऊन त्याची विक्री केली जात असते. मात्र आता कोणतेही खाद्यपदार्थ विकायचे असल्यास त्याची परवानगी आवश्यक असणार आहे. विना परवानगी विकल्यास जवळपास दोन लाख रुपयाचा दंड वसूल करण्यात येणार असल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाकडून सांगण्यात आले आहे.
शहरांमध्ये रस्त्यावर खाद्यपदार्थांचे विविध स्टॉल लावण्यात येत असतात. याशिवाय उपहारगृहात देखील स्पेशल डिश उपलब्ध असते. याठिकाणी जाऊन खवय्ये देखील आवडीने खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत असल्याचे पाहण्यास मिळते. बऱ्याचदा रस्त्यावर लागलेल्या स्टॉलवर उघड्यावरील खाद्यपदार्थ खाण्याने काहींना त्रास जाणवत असतो. यामुळे चे देखील यावर लक्ष असते. याच अनुषंगाने नवीन नियम लागू करण्यात येत आहे.
पुण्यात २६ हजार व्यावसायिकांकडे लायसन्स
रस्त्यावर किंवा उपहारगृहात खाद्यपदार्थ विकण्यासाठी आता अन्न व औषध प्रशासन विभागाचा फूड लायसन्स परवाना घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. आतापर्यंत एकट्या जिल्ह्यात जवळपास २५ हजार ९६० अन्न व्यवसायिकांनी फूड लायसन्स परवाना घेतला आहे. तर १ लाख २७ हजार ७८ व्यावसायिकांनी अन्न व औषध प्रशासन विभागाकडे आपली नोंदणी केली आहे. अर्थात जो काही खाद्य पदार्थ विक्री करायचा आहे. त्याची परवानगी आवश्यक झाली आहे.
तर दोन लाखाचा दंड होणार वसूल
फूड लायसन्स काढण्याचा खर्च हा अत्यंत कमी असल्याने रस्त्यावर अन्न पदार्थ विकणाऱ्यांनी फूड लायसन्स परवाना घेणे अनिवार्य आहे; असं अन्न व औषध प्रशासनाने जाहीर केले आहे. फूड लायसन्स शिवाय खाद्यपदार्थांची विक्री केल्यास अन्न व सुरक्षा मानद कायद्या अंतर्गत जवळपास दोन लाख रुपये इतका आर्थिक दंड वसूल करण्याची तरतूद आहे; असं अन्न व औषध प्रशासन विभागाने जाहीर केले आहे.